Amruta Deshmukh Emotional Post : ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वामध्ये प्रसाद जवादे व अमृता देशमुख या जोडीची सर्वाधिक चर्चा रंगली. प्रसाद व अमृतामध्ये असणारं प्रेमाचं नातं प्रेक्षकांना सर्वाधिक आवडलं. ‘बिग बॉस’नंतरही प्रसाद व अमृताची मैत्री कायम राहिली. इतकंच नव्हे तर या दोघांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. काही महिन्यांपूर्वी या जोडीने लग्न करत चाहत्यांना सुखद धक्का दिला. सोशल मीडियावरही ही जोडी बऱ्यापैकी सक्रिय असते. नेहमीच ती काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. अशातच अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. अमृताच्या आजोबांचं दुःखद निधन झालं असल्याचं तिने या पोस्टद्वारे सांगितलं आहे.
ही पोस्ट पाहून चाहतेमंडळी व कलाकारमंडळींकडून अमृताच्या पोस्टवर तिच्या आजोबांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. अमृताने आजोबांबरोबरचे काही खास फोटो शेअर करत भावुक असं कॅप्शन देत ही पोस्ट शेअर केली आहे. “मागच्या वर्षी २ सप्टेंबरला माझ्या आजोबांनी (आईचे बाबा- वसंत पोतनीस) सळसळत्या उत्साहात प्रसाद आणि माझं केळवण केलं होतं. आणि अगदी मंगळागौरीला सुद्धा भरपूर गिफ्ट व आशीर्वाद घेऊन आले होते. आज दुपारी आजोबा देवाघरी गेले. वय ८७. आम्हाला कुणालाच सवयच नाहीये आजोबा आणि त्यांचा उत्साह, त्यांचे व्हाट्सअपवरचे मॅसेज नसण्याची. आजोबा तुम्हाला आणि तुमच्यातल्या पॉसिटीव्हिटीला खूप मिस करु”, असं तिने म्हटलं आहे.
आणखी वाचा – ‘सूर जुळले’ म्हणत अंकिता वालावलकरने होणाऱ्या नवऱ्याबरोबर शेअर केले फोटो, कोण आहे तिचा जोडीदार?
अमृता व प्रसादच्या लग्नाआधीही दोघांच्या केळवणाला तिच्या आजोबांनी स्वतः जय्यत तयारी केलेली पाहायला मिळाली. यावेळी अमृताने पोस्ट शेअर करत म्हटलं होत की, “आजोबांनी (आईच्या बाबांनी) वयाच्या ८७व्या वर्षी सगळं प्लॅनिंग करुन भेटवस्तु, बुके या सगळ्यांनी सजवून केळवणाला सुरुवात केली. एवढं सगळं झाल्यावर मग उखाणा घ्या या आग्रहाला नाकारणार कसं?”. कुटुंबियांच्या आग्रहाखातर अमृता व प्रसादने एकमेकांसाठी खास उखाणा घेतला होता. त्याचाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
‘बिग बॉस’च्या घरात असताना झालेल्या मैत्रीचे रूपांतर ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर आल्यावर प्रेमात झालं. कालांतराने ही जोडी बरेचदा एकत्र स्पॉट होताना दिसली मात्र त्यांच्यात तसं काही नसल्याचं त्यांनी सांगितलं त्यानंतर थेट साखरपुड्याचे फोटो शेअर करत प्रसाद-अमृताने प्रेमाची कबुली दिली. त्यानंतर काही दिवसातच प्रसाद व अमृता लग्न बंधनात अडकले. प्रसाद व अमृता ही नेहमी चर्चेत असणारी जोडी आहे.