Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’चे पाचवे पर्व सध्या खूप गाजत आहे, सगळीकडे याच शोची चर्चा पाहायला मिळत आहे. या शोला प्रेक्षकांची खूप चांगली पसंती मिळत आहे. या आठवड्यात झालेल्या कॅप्टन्सी टास्कनंतर अरबाज पटेल दुसऱ्यांदा घराचा कॅप्टन झाला, तर वर्षा उसगांवकरांनी बी टीम सोडली आहे. त्यामुळे वीकेण्डच्या वारला या घरात काय घडणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. मात्र वीकेण्डलं भाऊचा धक्का न होता पत्रकारांची परिषद पार पडली. दर आठवड्याच्या शेवटी ‘बिग बॉस मराठी’चा भाऊचा धक्का प्रेक्षकांकडून पाहिला जातो. दर वीकेण्डला रितेश देशमुख घरात चुकीचं वर्तन करणाऱ्या सदस्यांची शाळा घेतो तर चांगले खेळ खेळणाऱ्यांचे कौतुकही करतो. (Bigg Boss Marathi 5 fame Arbaz Patel)
मात्र रितेश देशमुख शूटिंगनिमित्त परदेशात असल्यामुळे दर शनिवारी होणारा भाऊचा धक्का झाला नाही. याऐवजी पत्रकरांची परिषद झाली आणि या परिषदेत पत्रकारांनी घरातील सर्व सदस्यांना महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने काही प्रश्न विचारले. यावेळी घरातील सर्व सदस्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. यावेळी इट्स मज्जाच्या अंकिता लोखंडे यांनी अरबाजला असा प्रश्न विचारला की, “तुला ज्यांनी ज्यांनी सपोर्ट केला ते आज घराच्या बाहेर आहेत, तर स्वत:ला सेफ करत सर्वांना घरी पठवण्याचा तुझा गेम प्लॅन आहे का?”
आणखी वाचा – Bigg Boss Marathi च्या घरातून संग्राम चौगुलेला घ्यावा लागला निरोप, ‘या’ कारणामुळे संपला प्रवास
यावर अरबाजने उत्तर देत असं म्हटलं की, “आज चार लोक जे आहेत ते येच राहिले तर त्यापैकी एक पण जाणार नाही. तुम्ही टीममधून जसं फुटणार तसं एकेक करुन बाहेर जाणार. वैभव नॉमिनेशनमध्ये बाहेर गेला. याबद्दल मी निककीलाही बोललो होतो. हेच मी पॅडीदादांना पण सांगितलं. पण निक्की म्हणाली ठीक आहे अरबाज आता तो झाला तर झाला.” अरबाजच्या या उत्तराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

याच व्हिडीओच्याखाली ‘बिग बॉस मराठी’चा माजी स्पर्धक व अभिनेता अभिजीत केळकरने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अरबाजने दिलेल्या उत्तरावर अभिजीतने आपलं मत व्यक्त करत असं म्हटलं आहे की, “अरबाज खरं तर चांगला स्पर्धक आहे पण चुकीच्या नादाला लागून स्वतःचं नुकसान करून घेणार आहे. एक दिवस याच कारणामुळे तो बाहेर जाणार आणि बाहेर गेल्यावर त्याला ते लक्षात येईल. माझे शब्द लक्षात ठेवा”. दरम्यान, बिग बॉस मराठीमध्ये अरबाजचा गेम प्लॅन हा फक्त निक्कीच्या अवतीभवती असल्याचेही त्याला सांगण्यात आले.