शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi : “आम्हीही इथे मार खायला आलो आहोत का?”, निक्कीच्या आईला आर्याने सुनावलं, म्हणाली, “काकू तुम्ही…”

Saurabh Moreby Saurabh More
सप्टेंबर 16, 2024 | 4:56 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Aarya Jadhao responded to Nikki mother

Bigg Boss Marathi 5 मध्ये आर्या जाधवने निक्की तांबोळीला कानाखाली मारल्याबद्दल निक्कीच्या आईला थेट उत्तर दिलं आहे.

Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरातून आर्या जाधवला घराबाहेर काढलं आहे. निक्कीवर हात उचलल्यामुळे आर्याला ‘बिग बॉस’च्या घराबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. कॅप्टन्सी कार्यामध्ये आर्याने संयम सोडून निक्कीवर हिंसेचा प्रयोग केला. यानंतर ‘बिग बॉस’ने घरातील नियम मोडल्यामुळे आर्याला घराबाहेर काढलं आहे. कॅप्टन्सी टास्कदरम्यान निक्की आणि आर्यामध्ये धक्काबुक्की झाली. त्यानंतर आर्याने निक्कीला ‘मी तुला मारीन’ असं म्हटलं. त्यानंतर त्यांच्यातील वाद टोकाला गेला आणि आर्याने निक्कीवर हात उचलला. आर्याने निक्कीच्या कानाखाली मारली. ‘बिग बॉस’च्या घरात निक्कीवर हात उचलून हिंसा केल्यामुळे आर्याला घराबाहेरचा रस्ता दखवण्यात आला. (Aarya responded to Nikki’s mother)

आर्याने निक्कीला मारल्यानंतर निक्कीच्या आईने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली होती. यावेळी  निक्कीच्या आईने असं म्हटलं होतं की, “आर्याने निक्कीला शारीरिक इजा केली आणि ही गोष्ट निंदनीय आहे. ‘बिग बॉस’ने यांची गंभीर दाखल घ्यायला हवी. आम्हाला आमच्या मुलीची काळजी वाटत आहे. ‘बिग बॉस’च्या घरात तिच्याबरोबर रोजचं असं काहीतरी घडत आहे”. पुढे निक्कीच्या आईने थेट ‘बिग बॉस’लाच जाब विचारत “आमची मुलगी ‘बिग बॉस’च्या घरात मार खायला गेली आहे का?” असं म्हटलं होतं. शिवाय आर्याबद्दल त्यांनी “‘बिग बॉस’ला माझी हात जोडून विनंती आहे की, माझ्या मुलीला शारीरिक संरक्षण मिळालं पाहिजे” असंही म्हटलं. यावर आता आर्याने तिची भूमिका मांडली आहे.

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

आणखी वाचा – आई झाल्यानंतर पहिल्यांदाच कार्तिकी गायकवाड कामावर रुजू, कार्यक्रमाला केली सुरुवात, आता दिसते अशी

याबद्दल बोलताना आर्या असं म्हणाली की, “निक्कीची आई म्हणते माझी मुलगी इथे मार खायला आली आहे का? त्यांना मी सांगू इच्छिते की, काकू इतर मुलीही इथे मार खायला आल्या नाहीत. आम्हीही तिथे मार खायला गेलो नव्हतो. तिनेही मला धक्काबुक्कीमध्ये कानाखाली मारली. त्यावर माझी ती कानाखाली मारण्याची प्रतिक्रिया निघाली. मला जेव्हा बोलले घराबाहेर जा तेव्हा मी काहीच नाही बोलले. मला घरामध्ये ठेवा असंही नाही बोलले. कारण त्यांचा अनादर झाला असता. मी हात उचलणं पण चुकीचंच होतं. पण याचा अर्थ असा नाही की निक्की बरोबर आहे. आतापर्यंत तिनेही हात उचलला. तिथे कोण कोण हिंसा करत हे तुम्ही सगळ्यांनी पाहिलं आहे. अजूनही माझ्या अंगावर खुणा आहेत”.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : इरिनाबरोबर मैत्रीपलीकडे होतं नातं?, वैभवने पहिल्यांदाच दिलं स्पष्टीकरण, म्हणाला, “आमच्या दोघांचा स्वभाव…”

आर्याने आज इन्स्टाग्राम लाईव्ह सेशन घेतलं होतं. याट तिने तिच्या अनेक चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. त्याचबरोबर तिने निक्कीबरोबरच्या बाचाबाचीवरही भाष्य केलं. तसेच निक्की खूप वाईट गेम खेळत आहे. गेम खेळताना सात आठवड्यात मलाही बरेचदा लागलं होतं, असंही आर्या म्हणाली. दरम्यान, हिंसा केल्याप्रकरणी निक्कीला मारल्याबद्दल ‘बिग बॉस’ने आर्याला घरातून निष्कासित केलं. आर्याने केलेल्या कृतीनंतर सोशल मीडियावर काही चाहते आर्याचं समर्थन करताना दिसले होते, तर काहींनी या कृतीचा निषेध केला होता.

Tags: Aarya Jadhaobigg boss marathi 5Nikki Tamboli mother
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
Aarya Jadhao rap song

Bigg Boss Marathi : "कभी कपडे फाडे, कभी बात बाप तक गई", रॅपमधून आर्याने निक्कीचा खरा चेहरा आणला समोर, म्हणाली, "तेरा कर्मा…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.