Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च घर म्हटलं की वाद हे आलेच. अशातच ‘बिग बॉस’च्या आठव्या आठवड्याला सुरुवात झाली असून या आठवड्याची सुरुवातच वादाने झालेली पाहायला मिळतेय. ‘बिग बॉस’च्या घरात अगदी पहिल्या दिवसापासून निक्की तांबोळी व इतर स्पर्धकांमध्ये वाद झालेले पाहायला मिळाले. या वादाची बरीच चर्चा झालेली पाहायला मिळाली. निक्कीने अगदी पहिल्या दिवसापासून स्पर्धकांना पाण्यात बघायला सुरु केलं त्यामुळे हे वाद विकोपाला गेले. आता ‘बिग बॉस’च्या घरात पुन्हा एकदा निक्की तांबोळीच एका स्पर्धकासह वाजलं असल्याचं समोर आलं आहे.
निक्की तांबोळी व वाईल्ड कार्ड स्पर्धक संग्राम चौगुलेमध्ये वाजलं असल्याचं नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. या प्रोमोमध्ये निक्कीने संग्रामला थेट धमकी दिली असल्याचं पाहायला मिळत आहे. नुकत्याच झालेल्या एलिमिनेशन मध्ये टीम एमधील वैभव चव्हाणचा या घरातील प्रवास संपला. हा प्रवास संतच टीम ए मधील स्पर्धक व घरातील इतर सदस्यांनाही अश्रू अनावर झालेले पाहायला मिळाले. अशातच समोर आलेल्या प्रोमोमध्ये संग्रामने वैभवच्या एक्झिटनंतर आता निक्कीला आणि टीम एला टोमणा मारलेला पाहायला मिळत आहे.
प्रोमोमध्ये असं पाहायला मिळत आहे की, संग्राम म्हणतो, “जवळच्या माणसांना आधी खड्ड्यात घालायचं”. यावर निक्की आवाज चढवून बोलते, “फुसकीबार सारखे indirectly बोलायचं नाही या घरात. दम असेल तर तोंडावर बोलून दाखवायचं”. यावर संग्राम म्हणतो, “कुठल्या गोष्टी कशा घ्यायच्या हे तुम्हीच ठरवा”. यावर निक्की म्हणते, “थोडं डोकं वापरुन बोला. ना तळ्यात ना मळ्यात अशी तुमची परिस्थिती झाली आहे”. यावर संग्राम म्हणतो, “तुमच्यातील एकाला तुम्हीच काढणार आहात”, असं बोलत निक्कीला उत्तर देताना दिसत आहे.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi च्या घरातून वैभवची एक्झिट, ढसाढसा रडला अरबाज, इतर सदस्यांनाही रडू आवरेना
निक्कीने आजवर घरातील प्रत्येक स्पर्धकाशी वाद घातला आहे. आता वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून आलेल्या संग्रामबरोबर पुन्हा एकदा निक्कीच वाजलं असल्याचं पाहायला मिळत आहे. संग्रामने दिलेला टोमणा निक्कीला खटकला असून त्यावरुन तिने त्याला खडेबोल सुनावले आहेत.