सुप्रसिद्ध अभिनेत्री पूजा सावंत हिने आजवर तिच्या अभिनय शैलीने आणि तिच्या सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केला आहे चित्रपटांमधून आणि कृत्यातून पूजन प्रेक्षकांच्या मनात घर केलं असल्याचं पाहायला मिळतं. सोशल मीडियावर पूजा बऱ्यापैकी सक्री असते नेहमीच ठीक आहे ना काही शेअर करत चहा त्यांच्या संपर्कात राहत असतो. काही महिन्यांपूर्वीच पूजा विवाह बंधनात अडकली तेव्हापासून ती विशेष चर्चेत आलेली पाहायला मिळाली सोशल मीडियावर पूजाचा खूप मोठा चाहता वर्ग असलेला पाहायला मिळतो लग्नानंतर पूजा वरण तिच्या नवऱ्यावरही चाहते मंडळी भरभरून प्रेम करताना दिसतात. (Pooja Sawant New Video)
गेल्यावर्षी पूजाने सोशल मीडियावरुन नवऱ्याबरोबरचे खास फोटो शेअर करत प्रेमाची जाहीर कबुली दिली. त्यानंतर २८ फेब्रुवारी रोजी पूजाने सिद्धेश चव्हाणसह लग्नगाठ बांधली. हल्लीच त्यांच्या लग्नाला सहा महिने पूर्ण झाले आहेत. पूजाच्या लग्नाचे अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना पाहायला मिळाले. आता पूजा लग्नानंतर तिच्या नवऱ्यासह ऑस्ट्रेलियामध्ये राहते. मात्र मुंबईत गणेशोत्सवाची धामधूम पाहून पूजा थेट गणरायाचे दर्शन घेण्यासाठी ऑस्ट्रेलियावरुन भारतात परतली आहे. लग्नानंतरचा पूजाचा हा पहिलाच गणेशोत्सव आहे.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi च्या घरातून वैभवची एक्झिट, ढसाढसा रडला अरबाज, इतर सदस्यांनाही रडू आवरेना
पूजा तिच्या नवऱ्यासह ऑस्ट्रेलियात राहते. कारण पूजाचा नवरा हा कामामुळे ऑस्ट्रेलियाला स्थायिक आहे. अधून मधून कामानिमित्त ती भारतात येत असते मात्र काही दिवसांपूर्वीच ती ऑस्ट्रेलियाला तिच्या नवऱ्याकडे गेली होती. मात्र आता गणेशोत्सवाचे औचित्य साधत फक्त पूजाच नव्हे तर ती तिच्या नवऱ्यासह भारतात परतली आहे. घरच्या बाप्पाबरोबरचा पूजा व सिद्धेशने मुंबईतील नामांकित गणेशोत्सव मंडळांना भेट देत गणरायाचे दर्शन घेतले. यानंतर आता गणेशोत्सवातील एक सुंदर असा व्हिडीओ शेअर करत साऱ्यांचे लक्ष वेधले आहे.
“आपली पहिली भेट ते आपली सत्यनारायण पुजा”, असं कॅप्शन देत पूजाने सत्यनारायण पूजेचा खास व्हिडीओ शेअर केला आहे. मराठमोळ्या व पारंपरिक अंदाजात पूजा खूपच सुंदर दिसत आहे. गणेशोत्सवात पूजा व सिद्धार्थ यांनी सत्यनारायणाची पूजा घातली. हा सुंदर व्हिडीओ साऱ्यांचं लक्ष मोहून टाकत आहे. या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करत पसंती दर्शविलेली पाहायला मिळतेय.