Deepika Padukone Discharged : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण व अभिनेता रणवीर सिंहच्या घरी सध्या आनंदाचे वातावरण आहे. दीपिका व रणवीर अखेर आई-वडील झाले आहेत. दीपिकाने ८ सप्टेंबर रोजी मुलीला जन्म दिला आणि आता डिलिव्हरीच्या नऊ दिवसांनंतर अभिनेत्री दीपिका पदुकोणला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. अभिनेत्री आपल्या चिमुकली परी आणि कुटुंबासह घराकडे रवाना झाली आहे, ज्याचे फोटो नुकतेच सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. दीपिका पदुकोणला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असून ती मुलगी आणि नवरा रणवीरबरोबर घरी जाण्यासाठी रवाना झाली आहे. अभिनेत्री दीपिका पदुकोण आज म्हणजे रविवारी आपल्या लाडक्या मुलीसह रुग्णालयातून घराकडे रवाना झाली आहे. (Deepika Padukone Discharged From Hospital)
दीपिका व रणवीर त्यांच्या बाळासह घराकडे रवाना झाले आहेत आणि यावेळी रणवीरबरोबर दीपिकाची सासू-सासरेही त्यांच्या छोट्या परीला घेण्यासाठी हॉस्पिटलमध्ये पोहोचले होते. मात्र, हॉस्पिटलमधून बाहेर पडतानाच्या ना रणवीर व दीपिका दिसत होते ना घरातील इतर कुणी. त्यांची फक्त गाडी हॉस्पिटलबाहेर पडताना दिसली. पापाराझींनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या काही फोटोमध्ये दीपिका पदुकोणचा बॉडीगार्ड कारमध्ये बसल्याचं दिसत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओला दीपिका व रणवीरच्या अनेक चाहत्यांकडून लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे.
अभिनेत्री दीपिका पदुकोणने ८ सप्टेंबरला गोंडस मुलीला जन्म दिला. लग्नाच्या सहा वर्षांनंतर दीपिका-रणवीर आई-बाबा झाले आहेत. या जोडप्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली. गणेशोत्सवात दीपिका आणि रणवीरच्या आयुष्यात लक्ष्मीचं आगमन झाल्याचं बोलत त्यांच्या अनेक चाहत्यांनी चिमुकलीसह दीप-वीरवर शुभेच्छांचा वर्षाव केला. अशातच सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटो व व्हिडीओलाही नेटकऱ्यांकडून तूफान प्रतिसाद मिळत आहे.
दरम्यान, दीपिका पदुकोण व रणवीर सिंह यांनी २०१८ मध्ये लग्न केलं. लग्नाच्या ६ वर्षानंतर हे जोडपे एका मुलीचे पालक झाले आहेत. मुलीच्या जन्मानंतर घरात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. दीपिका व रणवीर यांनी प्रसूतीपूर्वी फोटोशूटही शेअर केले होते. ज्यामध्ये हे जोडपं खूपच गोड दिसत होते. या फोटोला मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी व चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्स करत प्रतिसाद दिला होता.