आपल्या रॉक, पॉप आणि रॅप गाण्यांवर तरुणाईला थिरकायला भाग पाडणारा गायक, संगीतकार व रॅपर म्हणजे यो यो हनी सिंह. हनी सिंह याने मोठा काळ गाजवला आहे. विशेष म्हणजे हनी सिंहचा सोशल मीडियावर फार मोठा चाहतावर्ग आहे. आजवर त्याने अनेक धमाकेदार गाणी देत प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे. ज्या गाण्याची आजही प्रेक्षकांवरील मोहिनी कायम आहे. ‘ब्रॉउन रंग’, ‘देसी कलाकार’, ‘सनी सनी’, ‘ब्ल्यू आईज्’, ‘मनाली ट्रान्स’ अशा अनेक लोकप्रिय गाण्यांनी हनी सिंहने प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे. मात्र, आज हनी सिंह जेव्हा त्याच्या जुन्या गाण्यांकडे मागे वळून पाहतो. तर त्याला त्याच्या स्वत:च्या गाण्यांबद्दल वाईट वाटतं. तेव्हा केलेल्या गाण्यांबद्दल त्याला आज हसू येत आहे असं त्याने म्हटलं आहे.
हनी सिंहने नुकतीच ‘द ललनटॉप’शी केलेल्या संवादात सांगितले की, त्या गाण्यांमध्ये यमक नव्हते, तरीही लोक त्या गाण्यांचा आनंद घेतात. संगीत आणि रेकॉर्डिंगसह संपूर्ण गाणे दोन तासांत तयार केल्याचे त्यांनी सांगितले. याबद्दल हनी सिंहने असं म्हटलं की, “मी लिहिलेले सर्वात मूर्ख गाणे म्हणजे ‘ब्लू है पानी पानी’, हे काय गाणं आहे?… आज ब्लू है पानी पानी आणि दिल भी सानी सानी, यात काहीही यमक नाही. किती मूर्खपणाचे गाणं आहे हे. खरं सांगू, सगळी गाणी बघा, काही यमक आहे का? डोके किंवा पाय आहे का?”
यापुढे तो पुढे म्हणाला की, “‘लुंगी डान्स, लुंगी डान्स… हे काय आहे, मला माहित नाही… या गाण्यावर रात्रभर पार्टी केली, मला माहित नाही की त्या गाण्यात असं काय आहे आणि त्या गाण्यासाठी मला लोक आजही डोक्यावर घेतात. मला अजूनही या गाण्यांमधून पैसा मिळतो कारण ही गाणी अजूनही वाजवली जात आहेत. तेव्हा आवाज चांगला होता आणि काही गोष्टी नवीन केल्या होत्या. पण आता ते बेताल आणि विचित्र वाटत आहे”.
दरम्यान, बॉलिवूडमधला लोकप्रिय रॅपर हनी सिंग त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळंही चर्चेत राहिला. बॉलिवूडमध्ये मोठं यश मिळाल्यानंतर, यशाची हवा डोक्यात गेली आणि हनी सिंगचं आयुष्य बदललं. तो अचानक गायब झाला.अशी एक वेळ आली की हनी सिंग डिप्रेशनमध्ये होता. तो बायपोलर डिसऑर्डरचा सामना करत होता. त्यामुळं त्यानं सिनेइंडस्ट्रीपासून दूर राहणं पसंत केलं.