Bigg Boss Marathi 5 :‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाला सुरुवात होऊन जवळपास एक महिना पूर्ण झाला आहे. त्यामुळे आता या घरात टिकून राहण्यासाठी प्रत्येक स्पर्धकामध्ये चुरशीची होत आहे. या घरात इतरांपेक्षा आपलं स्थान कसं टिकून राहिल यासाठी स्पर्धक एकमेकांनशी भिडत आहेत, या घरात आपलं स्थान टिकवून ठेवण्यासाठी ‘बिग बॉस’कडून प्रत्यकवेळी नवनवीन टास्क देण्यात येतात आणि या टास्कद्वारे स्पर्धकांना आपलं स्थान टिकवून ठेवावं लागतं. अशातच ‘बिग बॉस’ने घरातील स्पर्धकांना नुकताच एक नवीन टास्क दिला. ज्यातून त्यांना या घरात आपलं स्थान टिकवता येणार आहे. या टास्कचा एक नवीन प्रोमो नुकताच शेअर करण्यात आला असून या सर्व टास्कद्वारे घरातील स्पर्धकांना मानकाप्याच्या गुहेतून सोन्याची नाणी जिंकून आणायची आहेत. (Bigg Boss Marathi 5 New Promo)
‘बिग बॉस’च्या घरात खायचे सामान संपले असून हे सामान विकत घेण्यासाठी सर्वांना बीबी करन्सी कमवायची आहे आणि ही बीबी करन्सी जिंकण्यासाठी घरातील सदस्यांना मानकापाच्या गुहेत जाऊन सोन्याची नाणी आणायची आहेत. यासाठी सर्वांना नेमून दिलेल्या टीममध्येच व नेमून दिलेल्या जोडीदाराबरोबरच हा टास्क पूर्ण करता येणार आहे. बीबी करन्सी मिळवण्यासाठीचा हा टास्क असून याचा एक नवीन प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला आहे आणि या नवीन प्रोमोमधून घरातील स्पर्धक एकमेकांमध्ये चांगलेच भिडतानाचे पाहायला मिळत आहे.
या नवीन प्रोमोमध्ये घरातील सर्व स्पर्धक सोन्याची नाणी आणण्यासाठी मानकाप्याच्या गुहेत गेले आहेत आणि नाणी मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. यात विरुद्ध टीमला नाणी मिळू न देण्यासाठी स्पर्धक एकमेकांमध्ये भिडत आहेत. यासाठी घन:श्याम वर्षा यांना चांगलंच भिडत आहेत. मात्र अंकिता घन:श्यामचे पाय खेचत तिला अडवत आहे. त्यामुळे आता या नवीन टास्कमध्ये कोणाला अधिक सोन्याची नाणी मिळणार? आणि कोण या टास्कमध्ये जिंकणार? हे आजच्या भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील सर्व मंडळी पातळलोकात सोन्याची नाणी शोधायला जाणार आहेत. यात कोण कोणावर भारी पडणार याकडे सर्वांचच लक्ष लागलं आहे. टीम ए विरुद्ध टीम बी असा हा टास्क पार पडणार आहे. मानकाप्या राहत असलेल्या पाताळलोकात सोन्याची नाणी शोधावी लागणार आहेत. ही सोन्याची नाणी मिळवण्यासाठी दोन्ही गटांमध्ये जोरदार वादावादी होणार आहे.