रविवार, जून 1, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Keshavrao Bhosale Theatre Fire : ऐतिहासिक वारसा असलेले केशवराव भोसले नाट्यगृह आगीत जळून खाक, कलाकारांना अश्रू अनावर, नेमकं काय झालं?

Saurabh Moreby Saurabh More
ऑगस्ट 9, 2024 | 9:31 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Historical Keshavrao Bhosle theater in Kolhapur caught in fire know the reason

कोल्हापुरातील प्रसिद्ध नाट्यगृह अशी ओळख असलेल्या संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला आग, नेमकं काय झालं?

Keshavrao Bhosale Theatre : मनोरंजन क्षेत्राशी संबंधित एक मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे कोल्हापुरातील ऐतिहासिक वारसा असलेल्या केशवराव भोसले नाट्यगृहाला भीषण आग लागली आहे. आगीच्या घटनेनंतर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. रात्री साडे नऊ ते दहाच्या सुमारास ही आग लागल्याची माहिती आहे. कोल्हापूरातील खासबाग मैदानावरील व्यासपीठाच्या लाकडी स्टेजला आग लागल्याचा अंदाज आहे. खासबाग कुस्ती मैदानाच्या बाजूने आग लागल्याचा अंदाज असून त्यानंतर हीच आग केशवराव भोसले नाट्यगृहाला लागत पुढे आली. केशवराव भोसले नाट्यगृह हे संपूर्ण लाकडाचं असल्याने आग मोठ्या प्रमाणात भडकली. आगीचं कारण अद्याप समोर आलं नाही. नाट्यगृहात कोणीही नसल्याने कोणतीही जिवितहानी झाली नसल्याची माहिती मिळते आहे. केशवराव भोसले नाट्यगृहाचा संपूर्ण स्टेज जळून खाक झाला आहे. आगीचे वृत्त कळताच मनोरंजन विश्वातून हळहळ व्यक्त केली जात आहे. (Keshavrao Bhosle Theatre fire)

मराठी अभिनेता व दिग्दर्शक सुबोध भावेने केशवराव भोसले सभागृहाला लागलेल्या आगीबद्दल त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. इन्स्टाग्राम स्टोरीवर त्याने एक पोस्ट शेअर करत असं म्हटलं आहे की, “केशवराव भोसले नाट्यगृहाच्या आगीची दृश्ये अत्यंत भयंकर आहेत. केशवराव भोसले यांच्या नावाचे नाट्यगृह त्याच दिमाखात पुन्हा उभे राहायला हवे. महाराष्ट्रातील अत्यंत देखणे नाट्यगृह.” सांगीतकर व गीतकार सलील कुलकर्णी यांनीही नाट्यगृहाच्या आगीचा व्हिडीओ शेअर करत त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. “अतिशय आवडतं नाट्यगृह” म्हणत त्यांनी या प्रकरणी हळहळ व्यक्त केली आहे. तर रंगकर्मी प्रशांत दामले यांनी फेसबुक पोस्ट शेअर करत “संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह हे आम्हा नाटकवाल्यांचं अत्यंत आवडतं नाट्यगृह आगीच्या भक्ष्यस्थानी” असं म्हटलं आहे.

आणखी वाचा – 09 August Horoscope : ‘नागपंचमी’च्या दिवशी ‘या’ राशीच्या लोकांचं भाग्य उजळणार, नोकरी, व्यवसाय व शिक्षणात होणार फायदे

नाट्यगृहाला आग लागल्याने अनेकांकडून दु:ख व्यक्त केलं जात आहे. अनेक कलाकार, आमदार घटनास्थळी दाखल झाले आहेत. कलाकारांना अश्रू अनावर झाले आहेत. केशवराव भोसले नाट्यगृह जळताना बघवत नसल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत. केशवराव भोसले नाट्यगृहाला मोठा इतिहास आहे. त्यामुळे नाट्यगृहाला लागलेली आग ही खूप मोठी घटना आहे.

View this post on Instagram

A post shared by Bharat Jadhav (@sahibharat)

आणखी वाचा – Video : इरिनाला कोल्हापुरी भाषा शिकवताना पाहून धनंजय पोवारच्या बायकोची भलतील प्रतिक्रिया, शेअर केला व्हिडीओ, म्हणाल्या…

राजर्षी शाहू महाराजांच्या पुढाकाराने या नाट्यगृहाची उभारणी करण्यात आली होती. १९१३ ते १९१५ या काळात ते बांधलं गेलं. याचा रंगमंच २० फूट बाय ३४ फूट इतका प्रशस्त आहे. या नाट्यगृहाचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये प्रेक्षकांना रंगमंच पाहताना अडथळा ठरेल, असा एकही खांब नाही. राजर्षी शाहू महाराजांनी साकारलेल्या आणि त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या रुबाबदार वास्तूंनी पैलवानांच्या आणि कलाकारांच्या अनेक पिढ्या अंगाखांद्यावर खेळवल्या आणि या नाट्यगृहात अक्षरशः जगवल्या.

Tags: Keshavrao Bhosle theaterKeshavrao Bhosle Theater FireKeshavrao Bhosle Theater Fire News
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Paaru Serial Sharayu Sonawane
Entertainment

‘वाकडतोंडी’ म्हणत पारूबरोबरचा फोटो शेअर करणं अभिनेत्याला पडलं महागात, कमेंट करत म्हणाली, “स्वतःच किती…”

जून 1, 2025 | 2:00 pm
Ashok Saraf
Entertainment

पायलट भाचीचे अशोक सराफांना विशेष कौतुक, पद्मश्री पुरस्कारानंतरच्या विमानप्रवासात सांभाळली फ्लाईटची धुरा, म्हणाले, “तिने माझ्यासाठी भांडून…”

जून 1, 2025 | 10:00 am
Deepali Sayed On Vaishnavi Hagawane
Entertainment

“अरे ती गेली…”, वैष्णवीच्या अफेअरच्या चर्चांवर सुप्रसिद्ध अभिनेत्री भडकली, आई-वडिलांनाही केला सवाल, म्हणाली, “जर तुम्ही…”

मे 31, 2025 | 5:30 pm
Farah Khan Big Statement
Entertainment

“‘शीला की जवानी’ आतापर्यंतचे सर्वात स्वस्त गाणे”, स्वतःच्याच गाण्याला फराह खान ठेवतेय नाव, म्हणाली, “अश्लील…”

मे 31, 2025 | 4:01 pm
Next Post
Bigg Boss Marathi 5 New Promo suraj chavan struggle

"गेम कळला नाही पण…", Bigg Boss च्या घरात कचरा, धुनी-भांडी करतो सूरज चव्हाण, काही स्पर्धकही भावुक, पण कमी लेखणं का?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.