Bigg Boss Marathi 5 Update : ‘बिग बॉस मराठी’च्या नवीन पर्वात सूरज चव्हाणने सहभाग घेतला आहे. तेव्हापासून त्याच्याबद्दलच्या अनेक आशा-अपेक्षा चाहत्यांकडून वाढल्या आहेत. त्याच्या या घरातील सहभागाबद्दल कलाकार व चाहते मंडळी कौतुक करताना दिसून येत आहेत. गेल्या काही दिवसांपासून सूरजचा या घरातील सहभाग वाढला असून तो आता प्रत्येक कार्यात सहभागी होत आहे. घरातील प्रत्येक टास्कमध्ये तो सहभागी होत असून प्रत्येक मुद्द्यावर तो आपलं मत मांडत आहे. सूरजच्या ‘बिग बॉस’च्या घरातील वावराबद्दल, त्याच्या वागणुकीबद्दल, खेळातील टास्कमधील सहभागाबद्दल त्याचे अनेक चाहते कौतुक करत आहेत. याचबरोबर मराठी कलाविश्वातील कलाकार मंडळीही त्यांच्या सूरजविषयीच्या भावना व्यक्त करत आहेत. (Bigg Boss Marathi 5 daily update)
‘बिग बॉस मराठी’च्या नवीन पर्वाबद्दल किरण माने, पुष्कर जोग, जय दुधाणे, मीरा जगन्नाथ, विशाखा सुभेदार यांसारखे अनेक कालकार प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. या कलाकारांपैकी आणखी एक कलाकार पहिल्या दिवसापासून सूरजला पाठींबा देत असल्याचे पाहायला मिळत आहे आणि हा कलाकार म्हणजे उत्कर्ष शिंदे. उत्कर्षने सूरजबद्दल त्याच्या भावना वेळोवेळी व्यक्त केल्या आहेत. अशातच त्याने नुकतीच ‘रेडिओसिटी मराठी’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने सूरजचे कौतुक केलं आहे.
यावेळी त्याने असं म्हटलं की, “मी अख्ख्या महाराष्ट्राला सांगेन की सूरजला खूप खूप मतदान करा. मला राग का येतो, कारण मी आता बघतो की त्याला कुणीतरी हिणवत असतं, त्याला सतत कमी लेखत असतात. त्याला घरातील टास्कमधील कामे सुद्धा तशी दिली जातात. तो दोन-दोन वेळा भांडी घासत असतो. त्यालाच का दोन-दोन वेळा भांडी घासयला लावता. तोच का नेहमी टेबल पुसताना दिसतो. त्यालाच का तुम्ही बूट उचलायला लावता. तुम्हीचं म्हणत आहात या घरात सगळे समान आहेत. सर्वांना समान वागवलं पाहिजे मग त्याच्याबरोबर हे का?”
आणखी वाचा – Video : वाढदिवसाला प्राजक्ता माळीकडून मोठी घोषणा, ‘फुलवंती’ चित्रपटातील पहिला लूक, प्रेक्षकही भारावले
‘बिग बॉस’ने सूरजला बोलवून त्याला आत्मविश्वास दिला होता. याचे कौतुक करत उत्कर्षने असं म्हटलं की, “बिग बॉसने ते केलं हे मला खूपच आवडलं.” यापुढे त्याने जान्हवीकडून केल्या गेलेल्या त्याच्या अपमानावरही भाष्य केलं आहे. याबद्दल त्याने असं म्हटलं की, “एका भागात जान्हवीने त्याला फालतू म्हटलं. “किती फालतू आहे हा” असं ती त्याला बोलली” हेच जर उलट झालं असतं तर, म्हणजे जान्हवीने त्याला फालतू म्हटलं तसं जर सूरजने तिला फालतू म्हटलं असतं तर…”