बॉलीवूड अभिनेत्री जिया खान आत्महत्याप्रकरणी आरोपी मानण्यात आलेल्या सुरज पांचोलीची आज निर्दोष सुटका करण्यात आली आहे. जियाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप तिचा बॉयफ्रेंड सूरज पांचोलीवर ठेवण्यात आला होता. आज कोर्टाने याप्रकरणी निकाल दिला असून सर्व आरोपांतून सूरज पांचोलीची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.(Jiya Khan sucide case)
आत्महत्ये पूर्वी जिया ने लिहिलेलं पत्र सीबीआयला मिळालं जियाच्या त्या शेवटच्या पत्रात सूरज पांचोलीवर अत्याचार, फसवणूक आणि खोटे बोलणे यासह अनेक गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. 03 जून 2013 रोजी 25 वर्षीय जियाचा मृतदेह तिच्या जुहू येथील घरातून सापडला होता.

त्यानंतर जियाची आई राबिया यांनी सूरजविरोधात मुंबई न्यायालयात खटला दाखल केला होता.त्यांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी सूरजला अटकही केली होती. त्यानंतर 10 वर्षे तपास सुरू होता. जिया खानच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये डॉक्टरांनी सांगितले की, अभिनेत्रीचा मृत्यू गुदमरून झाला. म्हणजेच हा मृत्यू आत्महत्येमुळे झाला होता. जियाची आई राबिया खान यांनी सूरज पांचोलीवर अनेक गंभीर आरोप करत गेली १० वर्षे त्या आपल्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी न्यायालयात लढा देत आहेत.(Jiya Khan sucide case)