गेले काही दिवस ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेत अनेक नवनवीन ट्विस्ट येत असल्याचे पाहायला मिळत आहे.मालिकेत गेल्या काही दिवसांपासून नेत्राचे गरोदर दाखवण्यात आले आहे. यामुळे राजाध्यक्ष कुटुंबीय खूपच आनंदी होते. पण तिच्या पोटात वाढत असलेलं बाळ हे विरोचकाचाच एक अंश आहे हे कळताच सर्वांच्या तोंडचे पाणी पळाले. आधी तिला याबाबत माहिती नसते. मात्र नुकत्याच झालेल्या भागातून तिच्या पोटातील बाळ हे विरोचकाचे अंश असल्याचा उलगडा झाला आहे. यामुळे राजाध्यक्ष कुटुंबियांना मोठा धक्काच बसला आहे. त्रिनयना देवीवर विश्वास ठेवत तिच्यावर असलेल्या श्रद्धेमुळे नेत्रा व इंद्राणी या परिस्थितीत खचून जात नाहीत. पण आता मालिकेत येणाऱ्या एका नवीन वळणामुळे प्रेक्षकांना मालिकेत पुढे काय होणार याविषयी उत्सुकता लागून राहिली आहे.
नेत्राच्या पोटात विरोचकाचा अंश असल्याने राजाध्यक्ष कुटुंबीय नेत्राला गर्भपात करायला सांगत आहेत. मात्र नेत्राचा आईपणाचा पहिलाच अनुभव असल्याने ती गर्भपात करण्यास विरोध करत आहे. अशातच रुपाली नेत्राला इंद्राणीविरुद्ध भडकवण्याचे काम करत आहे. इंद्राणी तुझ्या बाळाला जीवे मारेल अशी भीती रुपाली नेत्राला वारंवार घालत आहे. त्यामुळे आता देवीआईच्याच लेकींमध्ये फूट पडत आहे. एकीकडे रुपाली नेत्राला तिच्या पोटात विरोचकाचा अंश असल्यावरून तिला सतत डिवचत आहे. तर दुसरीकडे इंद्राणी, अद्वैत सह राजाध्यक्ष कुटुंबीय नेत्राला तिचे बाळ नष्ट करण्यासाठी सांगत आहेत. यामुळे नेत्राला इंद्राणी तिच्या बाळाला खरंच मारेल की अशी भीती वाटत आहे.
अशातच मालिकेचा एक प्रोमो समोर आला आहे, ज्यामधून इंद्राणी नेत्राला काहीतरी खायला देऊन मारणार की काय असं दाखवण्यात आले आहे. या नवीन प्रोमोमध्ये शेखर व अद्वैत नेत्रा व इंद्राणी यांनी गर्भपात किंवा विरोचकाचा अंश हा विषय बाजूला ठेवून एकमेकींशी बोलल्या तर या सगळ्या परिस्थितीवर काहीतरी तोडगा निघेल असं म्हणत असतात. तेवढ्यात इंद्राणीही प्रयत्न करायलाच हवेत असं म्हणते. यानंतर इंद्राणी एक पदार्थ बनवून नेत्राला खायला देते आणि तो पदार्थ नेत्रा खातेदेखील. मात्र यात नेत्राच्या बाळाला मारण्यासाठी काही मिसळले असल्याची भीती तिला वाटत आहे.
त्यामुळे आता इंद्राणीच नेत्राच्या बाळाला नष्ट करणार का? असा प्रश्न पडला आहे. तसेच गेले काही दिवस देवीआईच्या लेकींमध्ये फूट पडल्याचे दिसत आहे. हीच फूट कायम ठेवण्यात रुपाली यशस्वी होईल का? की नेत्रा व इंद्राणी यातून काहीतरी सुवर्णमध्य काढतील? हे प्रेक्षकांना आगामी भागांत पाहायला मिळणार आहे.