शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनमध्ये वर्षा उसगांवकर, निखिल दामलेसह कोकण हार्टेड गर्लची एन्ट्री, सुरुवातीलाच नवा ट्वीस्ट, धुमाकूळ घालणार

Saurabh Moreby Saurabh More
जुलै 29, 2024 | 12:26 pm
in Entertainment
Reading Time: 7 mins read
google-news
Varsha Usgaonkar, Nikhil Damle and Konkan Hearted Girl have entered Bigg Boss Marathi 5.

'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनमध्ये वर्षा उसगांवकर, निखिल दामलेसह कोकण हार्टेड गर्लची एन्ट्री, सुरुवातीलाच नवा ट्वीस्ट, धुमाकूळ घालणार

Bigg Boss Marathi Season 5 Opening Ceremony Updates  : ‘बिग बॉस मराठी’ या बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित रिॲलिटी शोचं बिगुल आता वाजलं आहे आणि नुकतीच या शोच्या नव्या पर्वाची दिमाखात सुरुवातदेखील झाली आहे. ‘बिग बॉस मराठी’चं आलिशान घर आता नव्या रुपात नव्या सदस्यांच्या स्वागतासाठी तयार आहे. १०० हून अधिक कॅमेरे घरात येणाऱ्या कलावंतांवर आपली नजर रोखायला सज्ज झाले आहेत. या प्रवासात अतरंगी नमुन्यांचे बहुरंग, बहुढंग प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.

यंदा ‘बिग बॉस मराठी’च्या होस्टिंगची जबाबदारी रितेश देशमुख सांभाळणार आहे. गेल्या काही दिवसांपासून यावर्षी स्पर्धक म्हणून घरात कोण प्रवेश करणार याबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर आज पार पडणाऱ्या ग्रँड प्रीमियर सोहळ्यात याचा उलगडा होणार आहे. आशातच या घरातील पहिल्या स्पर्धकाची घरात एंट्री झाली आहे आणि या पहिल्या स्पर्धक म्हणजे ९०च्या दशक गाजवणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्री वर्षा उसगांवकर आहेत.

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

आणखी वाचा – ‘सैराट’च्या आर्चीची स्वप्नपुर्ती! स्वकमाईतून घेतली नवीन आलिशान कार, फोटो शेअर करत म्हणाली, ” माझं नवीन प्रेम…”

वर्षा उसगांवकर बिग बॉस मराठीच्या नवीन पर्वामध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा रंगली होती आणि या चर्चा अखेर आता खऱ्या ठरल्या आहेत. कारण बिग बॉसच्या नवीन पर्वात त्यांनी नुकताच प्रवेश केला आहे. वर्षा यांनी काही दिवसांपूर्वीच ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं!’ या मालिकेतून निरोप घेतला होता. तेव्हापासूनच त्या घरात येणार असल्याच्या चर्चा होत होत्या. वर्षा यांच्यासह कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावळकर व अभिनेता निखिल दामले यांचाही समावेश झाला आहे.

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

आणखी वाचा – Bigg Boss Marathi 5 Grand Premiere : ‘बिग बॉस मराठी’च्या नवीन पर्वाला सुरुवात, कोणकोणते स्पर्धक सहभागी होणार?, उत्सुकता शिगेला

दरम्यान, नुकतीच ‘बिग बॉस’ मराठीच्या पाचव्या पर्वाला धमाकेदार सुरुवात झाली असून हा नेत्रदीपक सोहळा प्रेक्षकांना कलर्स मराठी वाहिनीसह जिओ सिनेमावरही पाहता येणार आहे. रोज रात्री ९ वाजता ‘बिग बॉस मराठी’ हा शो बघता येणार आहे. २४ तास ड्रामा सुरु असणाऱ्या ‘बिग बॉस मराठी’च्या घरात यावर्षी काय घडणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.

Tags: bigg boss marathi 5Bigg Boss Marathi 5 Grand Premieremarathi entertainemnt news
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Bigg Boss Marathi Season 5 Grand Premiere Updates in Marathi

पंढरीनाथ कांबळे, जान्हवी किल्लेकर, योगिता चव्हाण 'बिग बॉस'च्या घरात राडा करण्यास तयार, मालिकेतील अभिनेत्री शोमध्ये राडा करणार

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.