भारतीय रॅपर आणि गायक यो यो हनी सिंग त्याच्या गाण्याबरोबरच त्याच्या वैयक्तिक आयुष्यासाठीही चर्चेत असतो. यो यो हनी सिंग घटस्फोटानंतर त्याच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत आहे. घटस्फोटानंतर आता गायकाचे नाव टीना थडानीशी जोडले गेले आणि त्यानंतर २०२३ मध्येच त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्या कानावर आल्या. यानंतर आता गायकाच्या आयुष्यात पुन्हा प्रेम आलं असल्याचं समोर आलं आहे. हनी सिंग सध्या अभिनेत्री हीरा सोहलला डेट करत असल्याचं समोर आलं आहे. मुंबईत होळीच्या वेळी त्याच्या कॉन्सर्टमध्येही हिरा दिसली होती. पंजाबी अभिनेत्री हीरा ‘थँक गॉड’ चित्रपटामध्ये दिसली आहे. (Yo Yo Honey Singh is in love)
अभिनेत्रीचे फोटो पाहून नेटकऱ्यांनी तिला मलायकाची कॉपी असे म्हटले आहे. २०२२ मध्ये हनीने शालिनी तलवारपासून घटस्फोट घेतला. यानंतर आता एका सूत्राने हनी सिंगच्या नवीन नात्याची पुष्टी केली आहे. एका नवीन अल्बमबद्दल बोलताना हनीने त्याच्या ब्रेकअपचे संकेतही दिले आहेत. टीना थडानीबरोबर ब्रेकअप झाल्यानंतर गायक-रॅपर यो यो हनी सिंगचे मन पुन्हा एका सुंदर महिलेवर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा गायक अभिनेत्री हीरा सोहलला डेट करत आहे आणि ही जोडी सार्वजनिक ठिकाणी बरेचदा एकत्र स्पॉटही होताना दिसली आहे.
या वर्षाच्या सुरुवातीला जेव्हा हनी सिंगने मुंबईत होळीसाठी आपला परफॉर्मन्स दिला होता (जो त्याचा खूप दिवसांनंतरचा पहिला परफॉर्मन्स होता) तेव्हा हीराही त्या कॉन्सर्टमध्ये उपस्थित होती. एका जवळच्या सूत्राने सांगितले की, “जवळपास एक वर्षापासून ते दोघे एकमेकांना डेट करत आहेत. दोघेही गेल्या महिन्यात रोमँटिक ट्रिपसाठी बाहेरही गेले होते. असे सांगितले जात आहे की, हनी त्याच्या नात्याबद्दल खूप मोकळा आहे आणि तो अनेकदा आपल्या पार्टनरबरोबर दिसतो.
मात्र, सध्या त्यांना त्यांचे नाते जगापासून लपवायचे आहे. हीरा ही पंजाबमधील एक अभिनेत्री आहे, जी पंजाबमधील अनेक म्युझिक व्हिडीओ, हिंदी वेबसीरिजचा भाग आहे आणि सिद्धार्थ मल्होत्रा स्टारर ‘थँक गॉड’मध्येही ती दिसली.