‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेत खूप मोठा ट्विस्ट आलेला पाहायला मिळत आहे. मालिकेत एकामागोमाग एक रंजक वळण येताना पाहायला मिळत आहे. लीला व एजे यांचं लग्न झाल्यापासून जहांगीरदारांचं आयुष्य पूर्णतः बदललं आहे. लीला घरात आल्यापासून एजे-लीलाची जोडी चर्चेत असलेली पाहायला मिळाली. रेवतीला किडनॅप केल्याने लीलावर एजेंशी लग्न करण्याची वेळ आहे. किडनॅपरने दिलेल्या धमकीमुळे एजे व लीलाचा लग्नसोहळा पार पडला. (Navri Mile Hitlerla Promo)
तर इकडे लग्न होऊनही एजेंनी लीलाचा बायको म्हणून स्वीकार केलेला नाही. त्यामुळे एजे व लीला एकत्रही आलेले नाहीत. दरम्यान आजींच्या आग्रहाखातर लीला एजेंच्या रूममध्ये राहायला तयार झाली आहे. मात्र एजेंनाही हे काही पटलेलं नाही. मात्र आईचा शब्द मोडणार कसा म्हणून ते लीलाला सहन करत आहेत. दोघेही एकत्र राहत असतात. तेव्हा लीला कपाट लावत असताना तिला किडनॅपर घातलेला मास्क दिसतो. तो मास्क पाहून लीलाचा खूप मोठा गैरसमज होतो.
लीलाला असं वाटत की, हा मास्क एजेंच्या कपाटात आहे म्हणजे रेवतीला एजेंनी पळवलं होतं. माझ्याशी लग्न करायला एजेंनी एवढा मोठा डाव आखला. लीला हे प्रकरण सर्वांसमोर आणते. आणि या घरात एकही क्षण राहायचं नाही असं म्हणून घर सोडून जाण्याचा निर्णय घेते. एजे लीलाला समजावण्याचा प्रयत्न करतात मात्र लीला कोणाचंच ऐकून घेत नाही. तेव्हा आजीही लीलाला समजावते आणि घर सोडून जाऊ नको असं सांगते. अशातच मालिकेचा एक प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये घर सोडून जाईन अशी धमकी दिलेली लीला पुन्हा घरात परतलेली दिसत आहे. आणि सोफ्यावर बसून ती सगळ्यांना बोलवायचे आदेश देते.
यावर एजे लीलाला विचारतात तू इथे काय करत आहेस. यावर एजे सांगते की, “मी या घरातून कुठेही जाणार नाही”. हे ऐकून एजे लीलाला बोलतात, “मी माझ्या होणाऱ्या बायकोसाठी सात अशक्य अटी घातल्या होत्या. त्या तुला पाळाव्या लागतील”. हे ऐकून लीला सर्व अटी मान्य असल्याचं सांगते. आता नव्याने सुरु झालेलं एजे व लीलामधील हे युद्ध कोणत्या पातळीला जाणार हे पाहणं रंजक ठरेल.