रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“अंबानीचं लग्न सर्कस आहे”, सुप्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शकाच्या लेकीचं मोठं वक्तव्य, म्हणाली, “मलाही बोलावलं पण मी नकार दिला कारण…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जुलै 9, 2024 | 5:50 pm
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
Anant Ambani And Radhika Merchant Wedding

"अंबानीचं लग्न सर्कस आहे", सुप्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शकाच्या लेकीचं मोठं वक्तव्य, म्हणाली, "मलाही बोलावलं पण मी नकार दिला कारण…"

सध्या मनोरंजन विश्वात अंबानी कुटुंबाची विशेष चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे. अनंत अंबानी व राधिका मर्चंट लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाची धामधूम सुरु असलेली पाहायला मिळत आहे. लग्नापुर्वीच्या विधींनाही सुरुवात झालेली पाहायला मिळत आहे. नुकताच राधिका व अनंत यांचा संगीत सोहळा व हळदी समारंभ अगदी थाटामाटात पार पडला. अंबानी कुटुंबाची चर्चा सुरु असताना चित्रपट निर्मात्याच्या लेकीने केलेलं भाष्य चर्चेत आलं आहे. (Anant Ambani And Radhika Merchant Wedding)

चित्रपट निर्माते अनुराग कश्यप यांची मुलगी आलिया कश्यप हिने नुकतेच अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या लग्नसोहळ्याबद्दल आपले मत व्यक्त केले आणि तिने याचे वर्णन ‘सर्कस’ असे केले आहे. याचबरोबर आलियाने तिला निमंत्रित करण्यात आल्याचा खुलासाही केला. मात्र, तिने या समारंभाला उपस्थित राहण्यास नकार दिला. आलियाने तिच्या इन्स्टाग्रामवरील ब्रॉडकास्ट लिस्टमध्ये असे म्हटलं आहे की, “यावेळी अंबानींचे लग्न नसून सर्कस बनले आहे”. तिने हे देखील कबूल केले की, या लग्नाचे व्हायरल व्हिडीओ पाहण्याचा ती आनंद घेत आहे आणि श्रीमंत लोकांच्या आयुष्याने तिला आकर्षित केले आहे, परंतु पार्टीचे आमंत्रण तिने नाकारले असल्याचं सांगितलं आहे.

आणखी वाचा – Video : ‘बिग बॉस ओटीटी’च्या घरामध्ये साप, स्पर्धकांचं लक्षच नाही, व्हायरल व्हिडीओमध्ये दिसलं संपूर्ण सत्य

तिने लिहिले, “मला काही कार्यक्रमांसाठी आमंत्रित करण्यात आले होते कारण ते PR करत होते पण मी नकार दिला कारण मला विश्वास ठेवायचा होता की, एखाद्याच्या लग्नासाठी स्वत: ला विकणे हे कधीही वाईट. हा माझा आत्मसन्मान मला अधिक महत्त्वाचा वाटला”. अनंत व राधिकाच्या कॉन्सर्टमध्ये जस्टिन बीबरच्या परफॉर्मन्सचाही समाचार घेतला आणि लिहिलं की, “आमच्याकडे जास्तीचे पैसे आहेत, त्याचे काय करायचे? अरे, जस्टिन बीबरला कॉल करुया”.

आणखी वाचा – बाप म्हणून चारुहास यांचा स्वीकार करणार का अधिपती?, दोघांनाही एकत्र आणण्यासाठी अक्षराचे प्रयत्न, भूवनेश्वरी नवी खेळी खेळणार

जस्टिन बीबरने कॉन्सर्टमध्ये त्याच्या परफॉर्मन्ससाठी तब्बल ८४ कोटी रुपये शुल्क आकारले होते आणि त्याने त्याची काही लोकप्रिय चार्टबस्टर गाणीदेखील यावेळी गायली होती. सलमान खान, रणवीर सिंग, अनन्या पांडे, सारा अली खान, जान्हवी कपूर, रणबीर कपूर, आलिया भट्ट, बादशाह, करण औजला व इतर कलाकारही कॉन्सर्टमध्ये परफॉर्म करताना दिसले. अनंत व राधिका १२ जुलै रोजी मुंबईत पारंपरिक पद्धतीने लग्नबंधनात अडकणार आहेत. यानंतर १३ जुलैला आशीर्वाद सोहळा आणि १४ जुलैला भव्य रिसेप्शन पार्टी होईल.

Tags: alia kashyap on ambani weddinganant ambani and radhika merchant weddinganurag kashyap daughterentertainment
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Jaywant Wadkar On Worli Hit and Run Case

धक्कादायक! वरळी हिट अँड रन प्रकरणात सुप्रसिद्ध अभिनेते जयवंत वाडकर यांच्या पुतणीचा मृत्यू, म्हणाले, "पैशाचा माज…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.