मुंबई आणि उपनगर परिसरात गेल्या काही तासांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. गेल्या सहा तासांमध्ये मुंबईत ३०० मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. मुंबईत सोमवारी भल्या पहाटेपासून सुरु झालेल्या पावसाने मुंबईची अक्षरश: तारांबळ झाली. अनेक चाकरमन्यांचे यामुळे हाल झाले. मुसळधार पावसामुळे रेल्वे आणि रस्ते वाहतुकीचा मुंबईकरांना मोठा सामना करावा लागला. त्यामुळे शासनाने शाळा व महाविद्यालयांना सुट्टीदेखील जाहीर केली.
मुंबईतील मुसळधार पावसामुळे शहराची लाईफलाईन असणारी रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. पहाटेपासून जोरदार पाऊस सुरु असल्याने मध्य रेल्वेच्या अनेक स्थानकांवर पाणी साचले होते. त्यामुळे मुंबई-ठाणे रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. संततधार पडणाऱ्या पावसामुळे हवामान खात्यानेही सावधानतेचा ईशारा दिला होता. विशेष म्हणजे हवामान विभागाकडून मुंबईसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे आज शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

कालच्या पावसाचा फटका हा सामान्य नागरीकांसह नेते व अभिनेते यांनाही बसला. अशातच आजच्या पावसाच्या परिस्थितीवर अभिनेत्री हेमांगी कवीने व्यंग्यात्मक पोस्ट शेअर केली आहे. कालच्या पावसाच्या अंदाजावरुन वेधशाळेने आजही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला होता. मात्र त्यानुसार आज पाऊस पडत नसल्याबद्दल हेमांगीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे खोचक पोस्ट शेअर केली आहे.
आणखी वाचा – चंदीगढमध्ये घर, १० फ्लॅट, महागड्या कार अन्…; अरमान मलिककडे आहे इतकी संपत्ती, ऑडीमध्ये बसून शाळेत जातो लेक
हेमांगीने या पोस्टमध्ये असं म्हटलं आहे की, “धन्यवाद वेधशाळा, तुमच्या अ‘चूक’ अंदाजामुळे शाळा, कॉलेजला सुट्ट्या, लोक बाहेर पडलेली नाहीत आणि बाहेर लख्ख ऊन पडलं आहे. त्यामुळे मी सुसाट शूटिंगला पोहोचत आहे”.
आणखी वाचा – ज्येष्ठ गायिका उषा उत्थुप यांच्या पतीचे निधन, टीव्ही पाहताना हृदयविकाराचा तीव्र झटका
हेमांगी ही सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रीय असते, सोशल मीडियावर ती तिचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. त्याचबरोबर सोशल मीडियावर ती अनेकदा राजकीय व सामाजिक विषयांवर भाष्य करतानादेखील दिसते. अशातच तिने वेधशाळेच्या पावसाबद्दलच्या अंदाजाबद्दल व्यंगात्मक पोस्ट शेअर केली आहे.