सुष्मिता सेन ही बॉलिवूडमधील सर्वात प्रतिभावान अभिनेत्रींपैकी एक आहे. अभिनेत्रीने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत अनेक आव्हानात्मक भूमिका साकारल्या असून आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे. अलीकडेच सुष्मिता सेनने इन्स्टाग्रामवर तिच्या अपडेट केलेल्या बायोद्वारे सर्वांना आश्चर्यचकित केले. खरंतर तिने आपली दुसरी जन्मतारीख सांगितली. पण ही दुसरी जन्मतारीख तिने बायोमध्ये का टाकली याचा खुलासा केला आहे. (Sushmita sen on her second life)
सुष्मिताने तिच्या दुसऱ्या जन्मदिवसाची गोष्ट उघड केली आहे. सन फार्माच्या सहकार्याने तिच्या इन्स्टाग्राम फीडवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये, अभिनेत्रीने तिच्या हृदयविकाराच्या झटक्यामागील कथा सांगितली. ज्याचा तिला शूटिंगदरम्यान त्रास झाला. तिने सांगितले की, ही तिच्या आयुष्यातील सर्वात मोठी ४५ मिनिटे होती आणि त्यांना वाटले की त्यांची कहाणी संपली आहे. सुष्मिता म्हणाली, “माझे आयुष्य एक गोष्ट आहे आणि मी ते आयुष्य जगले आहे. काही काळापूर्वी माझ्या आयुष्याच्या कथेत एक मोठं वळण आलं होतं. जेव्हा मला तीव्र हृदयविकाराचा झटका आला तेव्हा हे घडले. ती माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण ४५ मिनिटे होती. एक क्षण आला जेव्हा मला वाटले की माझं आयुष्य संपलं आहे”.
त्याच व्हिडिओमध्ये, तिने तिचा जीव वाचवल्याबद्दल त्याच्या डॉक्टरांचे आभार मानले आणि नमूद केले की डॉक्टरांनीच तिला २७ फेब्रुवारी २०२३ रोजी नव्या आयुष्याची संधी दिली. सुष्मिताने लिहिले, “पण माझ्या डॉक्टरांचे आभार, त्यामुळेच माझं आयुष्य अजूनही सुरु आहे. त्यांनी माझ्या आयुष्याची नवी कथा लिहिली आणि मला नवी दिशा दिली. हा माझा दुसरा वाढदिवस होता. मी तो दिवस आणि माझी कहाणी सर्व डॉक्टरांना समर्पित करत आहे. आज कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. माझ्या डॉक्टरांनी मला आयुष्यात दुसरी संधी दिली आहे”.
मार्च २०२३ मध्ये जयपूरमध्ये ‘आर्य’ या वेब सीरिजच्या शूटिंगदरम्यान सुष्मिताला हृदयविकाराचा झटका आला होता. अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सांगितले होते की, तिची अँजिओप्लास्टी झाली होती आणि तिच्या हृदयातून स्टेंट टाकण्यात आला होता. सुष्मिताने लिहिले होते, “तुमचे हृदय आनंदी व धाडसी ठेवा. मला काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. अँजिओप्लास्टी झाली होती. स्टेंट टाकले होते. आता सर्व काही ठीक आहे आणि मी पुन्हा नव्या आयुष्यासाठी तयार आहे”, अशी पोस्ट तिने केली होती.