देशातील सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानी व नीता अंबानी यांचे कुटुंब कोणत्या ना कोणत्या कारणाने कायमच चर्चेत राहतअ असतं. येत्या १२ जुलै रोजी अंबानी यांचा धाकटा धाकटा मुलगा अनंत अंबानी राधिका मर्चंटबरोबर विवाहबंधनात अडकणार आहे. पण याच दरम्यान मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानीने एक धक्कादायक खुलासा केला आहे. ईशा अंबानीने आपल्या जुळ्या मुलांना जन्म देण्यासाठी आई नीता अंबानीसारखीच IVF ची मदत घेतल्याचा खुलासा केला आहे. मूल नसलेल्या जोडप्यांसाठी IVF हे तंत्रज्ञान वरदानापेक्षा कमी नाही. या फर्टिलिटी ट्रिटमेंटच्या मदतीने अनेकांना पालक बनण्याचा आनंद मिळाला आहे.
ईशा अंबानीने ‘वोग इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत IVF द्वारे आई होण्याचा तिचा वैयक्तिक प्रवास शेअर केला. IVF बद्दलचे गैरसमज मोडून काढणे आणि पालकत्वाच्या मार्गावर इतरांना प्रेरणा देण्याच्या उद्देशाने तिने प्रक्रियेतील आव्हाने आणि शारीरिक मागण्यांबद्दल प्रांजळपणे चर्चा केली. यापुढे ईशाने या प्रक्रियेबद्दल बोलताना म्हटले की “जसं आईने म्हणजेच नीता अंबानींनी मला आणि आकाशला जन्म दिला तोच मार्ग मी सुद्धा निवडला”. ईशानेही जनजागृती व्हावी म्हणून ही गोष्ट खुलेआम सांगितली. ही प्रक्रिया अजिबात सोपी नाही आणि यातही प्रेग्नेंसीसारखाच त्रास होतो. आपण थकून जातो असंही तिने म्हटलं.
आणखी वाचा – विरोचकामुळे नेत्राच्या बाळाच्या जीवाला धोका, देवीआई रक्षण करणार का? की विरोचकच नवीन डाव साधणार?
ईशाच्या बोलण्यावरून स्पष्टपणे दिसून येते की ती देखील मानते की IVF बद्दल लोकांच्या वेगवेगळ्या समजुती आहेत आणि आजही बरेच लोक IVF बाळांकडे वेगळ्या नजरेने पाहतात. टीव्ही अभिनेत्री देबिना बॅनर्जी यांनाही IVF द्वारे मोठी मुलगी झाली आहे आणि तिने असेही सांगितले की लोक IVF बाळांकडे वेगळ्या नजरेने पाहतात जे योग्य नाही.
ईशा अंबानीने सांगितले की, लग्नाच्या सात वर्षानंतरही तिची आई (नीता अंबानी)यांनी सात वर्षानंतर IVF च्या मदतीने गर्भवती झाली. त्यानंतर इशा आणि आकाश अंबानीचा जन्म झाला होता. दरम्यान, ईशा अंबानीने २०१८ मध्ये उद्योगपती आनंद पिरामलबरोबर लग्न केलं होतं. त्यानंतर २०२२ मध्ये ईशाने IVF द्वारे दोन जुळ्या बाळांना जन्म दिला. याबद्दल तिने आता खुलासा केला आहे.