शुक्रवार, मे 9, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

आधी रुसवा, आता शत्रुघ्न सिन्हांचा आनंद गगनात मावेना, लेकीच्या लग्नानंतर म्हणाले, “झहीरबरोबर ती…”

Saurabh Moreby Saurabh More
जून 24, 2024 | 10:32 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Shatrughan Sinha expressed his reaction on Sonakshi and Zaheer Iqbal's marriage. Know more

आधी रुसवा, आता शत्रुघ्न सिन्हांचा आनंद गगनात मावेना, लेकीच्या लग्नानंतर म्हणाले, "झहीरबरोबर ती…”

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा गेले काही दिवस तिच्या लग्नामुळे चांगलीच चर्चेत आहे आणि अखेर अभिनेत्री झहीर इक्बालबरोबर विवाहबंधनात अडकली आहे.  मुंबईत अगदी थाटामाटात या जोडप्याचा विवाहसोहळा संपन्न झाला आहे. मुंबईत सोनाक्षीच्या घरी स्पेशल मॅरेज ॲक्टनुसार दोघांनी एकमेकांबरोबर विवाहगाठ बांधली. लग्नाची नोंदणी करताना सोनाक्षी व झहीरचे कुटुंबीय उपस्थित होते.

सोनाक्षीच्या लग्नाममुळे तिचे वडील व ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा हे  नाराज असल्याच्या अनेक चर्चा सुरु होत्या. त्यामुळे शत्रुघ्न सिन्हा लेकीच्या लग्नाला जाणार नसल्याबद्दलही बोलले जात होते. मात्र तसे काही नसून शत्रुघ्न सिन्हा लेकीच्या लग्नाला हजर होते. तसेच त्यांनी आपल्या लेकीला व जवायला आशीर्वादही दिले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. प्रसारमाध्यमांशी बोलताना शत्रुघ्न सिन्हा यांनी मनमोकळेपणाने आपल्या भावना व्यक्त केल्या.

View this post on Instagram

A post shared by Sonakshi Sinha (@aslisona)

आणखी वाचा – सोमवारी मिथुन राशीसह ‘या’ राशीच्या लोकांची होईल इच्छित प्रगती, आर्थिक फायदाही होणार, जाणून घ्या…

यावेळी शत्रुघ्न सिन्हा असं म्हणाले की, “प्रत्येक वडील या क्षणाची वाट पाहत असतात, जेव्हा त्याची मुलगी तिच्या आवडीच्या व्यक्तीकडे सोपवली जाते. माझी मुलगी झहीरबरोबर खूप आनंदी आहे. ही माझ्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे आणि देव या जोडप्याला कायम आनंदी व सुखी ठेवो”. अगदी साधेपणाने सोनाली व झहीरने हे लग्न केलं आहे. सोनालीने लग्नात पांढऱ्या रंगाची डिझाइनर साडी नेसली होती, तर झहीरने पांढऱ्या रंगाची शेरवानी परिधान केली होती. लग्नावेळी सोनालीचे वडील शत्रुघ्न सिन्हाही खूप आनंदी असल्याचे दिसले.

आणखी वाचा – रुपालीच्या प्रतिबिंब शक्तीचा शेखरला संशय, विरोचकाच्या शक्तीपासून नेत्राच्या बाळासह राजाध्यक्ष कुटुंबीय वाचणार का?  

दरम्यान, सोनाक्षी सिन्हा व झहीर इक्बाल यांनी २३ जून रविवार रोजी संध्याकाळी नोंदणी पद्धतीने एकमेकांबरोबर विवाहगाठ बांधली. सोनाक्षी-झहीरने सिव्हिल मॅरेज म्हणजेच १९५४ च्या स्पेशल मॅरेज ॲक्ट अंतर्गत, मुंबईतील वांद्रे येथे सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल या दोघांच्या कुटुंबातील सदस्य आणि काही खास मित्रांच्या उपस्थितीत लग्नाची नोंदणी केली आहे. त्यांच्या या लग्नानंतर मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकार व चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Tags: Bollywood entertainment newsshatrughan sinhaSonakshi Sinha Zaheer Iqbal Marriage
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Akshay Kelkar Wedding
Entertainment

शुभमंगल सावधान! ‘बिग बॉस’ फेम सुप्रसिद्ध अभिनेता अडकला लग्नबंधनात, लग्नातील पहिला फोटो समोर

मे 9, 2025 | 6:08 pm
Aly Goni Viral Post
Entertainment

“जम्मूमध्ये माझं कुटुंब हल्ले सहन करतायत”, भारत-पाकमधील वाढत्या तणावामुळे प्रसिद्ध अभिनेता काळजीत, सांगितली सत्य परिस्थिती…

मे 9, 2025 | 5:35 pm
Pakistani Person Viral Video
Social

“त्यांना न्याय मिळाला”, पाकिस्तानी नागरिकाकडून भारतीय सैन्याचे कौतुक, पाक सैन्याला खडेबोल सुनावत…

मे 9, 2025 | 4:08 pm
Neha Kakkar Attends Driver Wedding 
Entertainment

नेहा कक्करची ड्रायव्हरच्या लग्नात उपस्थिती, नवरी मुलगी नमस्कार करण्यास खाली वाकताच घेतलं जवळ, गायिकेच्या कृतीने जिंकलं मन

मे 9, 2025 | 1:03 pm
Next Post
Tharal Tar Mag Serial Update

अर्जुन चैतन्यवर मोठं संकट, वकिलांमार्फत महिपतने आखला नवा डाव, आश्रम केसचं नक्की काय होणार?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.