शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अभिषेक बच्चनने बोरिवलीत खरेदी केले एक नव्हे तर तब्बल सहा घरं, किंमत ऐकून व्हाल थक्क

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 19, 2024 | 12:10 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Abhishek Bachchan New Home

अभिषेक बच्चनने बोरिवलीत खरेदी केले एक नव्हे तर तब्बल सहा घरं, किंमत ऐकून व्हाल थक्क

अभिषेक बच्चन हा बॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध व लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. बिग बी अमिताभ बच्चन व जया बच्चन यांचा तो मुलगा आहे. ‘गुरु’, ‘मनमर्जियां’, ‘दासवी’ यांसारख्या चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण काम करत त्याने स्वतःच एक वेगळं स्थान निर्माण केलं. असं असलं तरी त्यांच्या वडिलांच्या उंचीपर्यंत अद्याप तो पोहोचू शकला नाही, पण त्याच्या अभिनयाच नेहमीच कौतुकही केलं जातं. अभिनेत्याने मुंबईतील बोरिवली भागात सहा अपार्टमेंट्स खरेदी केल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये केला जात आहे. (Abhishek Bachchan New Home)

‘हिंदुस्तान टाईम्स’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, अभिषेक बच्चनने मुंबईच्या बोरिवली परिसरात ओबेरॉय रियल्टी इस्टेट अंतर्गत ओबेरॉय स्काय सिटी प्रकल्पात सहा अपार्टमेंट्स खरेदी केले आहेत. ज्याची किंमत १५.४२ कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. अहवालात पुढे असे म्हटले आहे की, कागदपत्रांनुसार, अभिनेत्याने एकूण ४,८९४ चौरस फूट RERA कार्पेट ३१,४९८ रुपये प्रति चौरस फूट या किमतीने खरेदी केले आहे.

आणखी वाचा – श्रद्धा कपूरने राहुल मोदीबरोबरच्या प्रेमाची जाहीरपणे दिली कबुली, एकत्र फोटोही केला शेअर, म्हणाली, “माझं हृदय…”

बोरिवली पूर्वेकडील वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे (WEH) च्या बाजूला असलेल्या इमारतीच्या ५७व्या मजल्यावर सहा अपार्टमेंट आहेत. कागदपत्रांमध्ये पुढे नमूद केले आहे की, १० कार पार्किंग सुविधांसह सहा अपार्टमेंटची नोंदणी २८ मे २०२४ रोजी झाली होती. याव्यतिरिक्त, सहा अपार्टमेंटपैकी दोन २५२ चौरस फूट आकाराचे आहेत, दोन अपार्टमेंट १,१०० चौरस फूट आहेत, तर उर्वरित दोन अपार्टमेंट १०९४ चौरस फूट आहे.

आणखी वाचा – आदित्यसाठी पारू करणार वडाची पूजा, दिशा-दामिनीसमोर येणार का सत्य?, मालिकेत रंजक ट्विस्ट

अभिषेकने ओबेरॉय रियल्टी अपार्टमेंटमध्येही गुंतवणूक केली आहे. २०२१ मध्ये, त्याने ओबेरॉय रियल्टीच्या ‘ओबेरॉय ३६० वेस्ट’ प्रकल्पातील एक अपार्टमेंट वरळी, मुंबई येथे ४५.७५ कोटी रुपयांना विकले. २०१४ मध्ये त्याने ४१ कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीत हे अपार्टमेंट विकत घेतले होते. आणि आता त्याने सुमारे १५ कोटी रुपयांना ६ अपार्टमेंट खरेदी करत सर्वांना आश्चर्यचकित केले आहे.

Tags: abhishek bachchanabhishek bachchan new flatAbhishek Bachchan New Homebollywod gossip
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Suniel Shetty is the owner of the same hotel where his father worked as a table cleaner see the details

वडिलांनी ज्या हॉटेलमध्ये टेबल पुसले, त्याच हॉटेलचा मालक आहे सुनील शेट्टी, अभिनेत्याने सांगितली त्याची संघर्ष कहाणी

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.