मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री क्रांती रेडकर हिने आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तिने साकारलेल्या विविध भूमिकेला प्रेक्षकांकडून कौतुकाची थाप मिळाली आहे. सध्या ती मनोरंजन क्षेत्रात फारशी सक्रिय नसली तरीही तिचा सोशल मीडियावर तिचा वावर नेहमीचं असतो. क्रांती नेहमीच तिच्या जुळ्या मुलींचे अनेक गोड व अतरंगी क्षण तिच्या चाहत्यांसह शेअर करत असते. चाहत्यांनादेखील तिच्या मुलींचे व्हिडीओ हे व्हिडीओ विशेष आवडतात.
अशातच तिने त्यांच्या बद्दलचा एक नवीन व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये क्रांतीने तिच्या लेकींमुळे तिच्या आईला होणाऱ्या त्रासाबद्दल सांगितले आहे.या व्हिडीओमध्ये ती असं म्हणते की, “आम्ही छबील व गोदो यांच्यासाठी फोन लागणारे व स्मार्ट वॉच घेऊन घेतले आहेत. महणजे यात जीपीएस वगैरे आहे तर यामुळे तुमचं तुमच्या मुलांवर लक्ष राहत. पण याचं एक नुकसान असं आहे की यात नंबर असल्यामुळे हे लोक घरात आल्यापासून नातेवाईकांना फोन करत आहेत”.
यापुढे तिने असं म्हटलं आहे की, “माझी आई यांना इतकी वैतागली आहे की माझ्या आईने माझ्याकडे रेहम की भीख मागितली आहे. म्हणजे माझी आई तिला छबील व गोदो यांच्याबरोबर बोलायचे असते तेव्हा फोन करते. त्यामुळे मी हा विचार केला की मी छबील व गोदो यांना हे गॅजेट दिलं तर त्यांचं त्यांचं ते बोलू शकतील. पण आता या इतक्या फोन लावतात की माझ्या आईने मला वैतागून मला फोन केला आणि सांगितलं की, “कृपया दोन आता दोन तास झोपायचं आहे. त्यामुळे त्यांना सांग की, मला फोन करु नको”
आणखी वाचा – Video : शेवटी बापच तो! त्याक्षणी लेकीसाठी ढसाढसा रडला आमिर खान, म्हणालेला, “गेल्या वर्षांत ती माझ्यापेक्षा…”
यापुढे तिने “त्यामुळे हे आजी-आजोबांशी त्यांच्या नातवांचा संपर्क करण्यासाठी हे खूपच चांगलं गॅजेट आहे” असंही म्हटलं आहे. दरम्यान, क्रांतीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर बराच व्हायरल होत असून या व्हिडीओलं तिच्या अनेक चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्स करत प्रतिसाद दिला आहे. अनेकांनी या व्हिडीओखाली हसण्याच्या ईमोजी पोस्ट करत या व्हिडीओला प्रतिसाद दिला आहे. तसेच अनेकांनी या व्हिडीओखाली क्रांतीच्या लेकींना “तुझ्या लेकी खूपच मस्तीखोर आहेत” असंही म्हटलं आहे.