दिवंगत अभिनेते डॉ. राजकुमार यांचा नातू आणि अभिनेता राघवेंद्र राजकुमार यांचा मुलगा युवा राजकुमार याच्या वैवाहिक आयुष्यात खूप मोठं वादळ आलं असल्याचं समोर आलं आहे. दरम्यान, प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता युवा राजकुमार घटस्फोट घेत असल्याची माहिती समोर आली आहे. लग्नाच्या पाच वर्षानंतर अभिनेता आता त्याची पत्नी श्रीदेवी बायरप्पा हिला घटस्फोट देणार आहे. गेल्या एक वर्षापासून दोघांच्या वैवाहिक आयुष्यात वाद सुरु होते. केवळ पाच वर्ष या दोघांचा संसार टिकला. (Yuva Rajkumar-Sridevi Byrappa Divorce)
वृत्तांवर विश्वास ठेवला तर युवा राजकुमार आणि श्रीदेवी यांच्या कुटुंबीयांनी दोघांमधील वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोघांमध्ये काही सुधारणा न झाल्याने आता युवा राजकुमारने घटस्फोटाची याचिका दाखल केली आहे. श्रीदेवी यांच्याकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. २६ मे २०१९ रोजी लग्न झालेल्या युवा राजकुमार आणि श्रीदेवी बायरप्पा यांच्यात बराच काळ वाद सुरु होता.युवाने सात वर्षांच्या मैत्रीनंतर वयाच्या २६ व्या वर्षी वडिलांचा विरोध पत्करून प्रेम विवाह केला होता.
आता युवा राजकुमारने घटस्फोटासाठी याचिका दाखल केली आहे. यावरुन आता या अभिनेत्याने पत्नीबरोबरचे नाते संपवण्याचा निर्णय घेतला असल्याचे स्पष्ट झाले आहे. युवा राजकुमारने पत्नी श्रीदेवी बायरप्पावर क्रूरतेचे आरोप करत हिंदू विवाह कायद्यांतर्गत घटस्फोट याचिका दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, सत्य काय आहे हे अद्याप समोर आलेले नाही.
एशियानेट न्यूजनुसार, युवा राजकुमारने वडील राघवेंद्र राजकुमार यांचा विरोध पत्करून श्रीदेवी बायरप्पाशी लग्न केलं होतं. दिवंगत अभिनेता पुनीत राजकुमाने या जोडप्याला पाठिंबा देत त्यांचं लग्न लावून दिलं होतं. पण दोघेही हे लग्न टिकवू शकले नाही पण आता लग्नाच्या काही वर्षानंतर त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला होता, त्यानंतर आता या अभिनेत्याने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे.