अभिनेत्री नूर मालबिका दास यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण चित्रपटसृष्टीला धक्का बसला आहे. नूर मालबिका नुकतीच तिच्या भाड्याच्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळली. ६ जून रोजी नूर मालबिकाचा मृत्यू झाल्याचे समोर आले, परंतु चार दिवसांनी याची बातमी आली आणि पोलिसांनी तिचा मृतदेह ताब्यात घेतला. यानंतर आता दिवंगत अभिनेत्रीच्या कुटुंबीयांचे वक्तव्य समोर आले आहे. नूर मालबिका ही डिप्रेशनने त्रस्त होती. असा दावा कुटुंबीयांनी केला आहे.बॉलिवूडमध्ये काम करु न शकल्याने ती तणावाखाली होती. (Noor Malabika Das Family Statement)
बांगलादेश सीमेजवळ आसाममधील करीमगंज येथील नूर मलाबिका दासला अभिनेत्री व्हायचं होतं. कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, नूर मालबिका ही नैराश्यात होती आणि त्यामुळेच तिने जीवन संपवण्याच कठोर पाऊल उचललं. मात्र, नूर मालबिकाचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट अद्याप समोर आलेला नाही. गोरेगाव येथील बीएमसीच्या सिद्धार्थ रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.
मालबिका दासची मावशी आरती दास यांनी करीमगंजमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी तिने ‘टाइम्स ऑफ इंडिया’शी संवाद साधला असता, “अभिनेत्री बनण्याच्या मोठ्या आशेने मुंबईला गेली होती आणि त्यासाठी ती खूप मेहनत करत होती. आम्हाला असे कळले होते की, मालबिका तिच्या कामावर समाधानी नव्हती, ज्यामुळे तिला हे पाऊल उचलण्यास भाग पाडले”. या दुःखद घटनेनंतर अखिल भारतीय सिने कामगार संघटनेने (AICWA) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. पोलिसांना संशय आहे की नूर मालबिकाची हत्या करण्यात आली आहे, आणि म्हणून संपूर्ण प्रकरणाचा सखोल आणि अनेक कोनातून तपास करण्यास सांगितले आहे.
त्याच वेळी, पोलिसांनी सोमवारी, १० जून रोजी सांगितले होते की, ओशिवरा येथील नूर मलबिका दास यांच्या घरातून दुर्गंधी येत असल्याची तक्रार मिळाल्यानंतर, एका टीमने तिच्या फ्लॅटचा दरवाजा तोडला. घरात गेल्यानंतर नूर मालविकाचा विकृत आणि कुजलेला मृतदेह आढळला. नूर मालबिका हिने ६ जून रोजी गळफास घेतल्याचे वृत्त आहे. तिचा मृतदेह मित्र आणि व्यावसायिक सहकारी ए.एन. वाचकांकडे सुपूर्द करण्यात आला. रविवारी एका स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अंतिम संस्कार केले. नूर मालबिकाचे आई-वडील गेल्या आठवड्यातच त्यांच्या घरी गेल्यामुळे त्यांच्या अंत्यविधीला उपस्थित राहू शकले नाहीत.