रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

नवऱ्याच्या पहिल्या लग्नावेळी एक वर्षाची होती सुप्रसिद्ध अभिनेत्री, लग्नाच्या सात वर्षातच पतीचं निधन, आता कसं जगते आयुष्य?

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 10, 2024 | 8:30 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Leena Chandravarkar

नवऱ्याच्या पहिल्या लग्नावेळी एक वर्षाची होती सुप्रसिद्ध अभिनेत्री, लग्नाच्या सात वर्षातच पतीचं निधन, आता कसं जगते आयुष्य?

७०-८०च्या दशकात बऱ्याच अशा अभिनेत्री आहेत ज्या लहान वयातच सिनेविश्वात पदार्पण करत असत. बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी लहान वयातच लोकप्रियता मिळवली. अशीच एक अभिनेत्री जी वयाच्या १७व्या वर्षी बॉलिवूडमध्ये प्रसिद्धीच्या झोतात आली आणि तिने कमी वयात लग्न करण्याचा निर्णय घेतला. तिच्या चित्रपट कारकिर्दीत महत्त्वपूर्ण कामगिरी करत असताना, तिच्या वैयक्तिक आयुष्याने तिला खूप धक्के दिले आणि यामुळेच ती त्यात इतकी अडकू लागली की बाहेर पडण्याचा तिचा प्रयत्न प्रत्येक वेळी अयशस्वी ठरला. (Leena Chandravarkar)

लहान वयातच मोठ्या पडद्यावर दाखल झालेली लीना चंदावरकर ही वयाच्या २०व्या वर्षी बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींच्या यादीत सामील झाली. त्यानंतर पुढच्या काही वर्षात ती ‘हमजोली’, ‘मेहबूब की मेहंदी’, ‘मंचली’ आणि ‘बिदाई’सारख्या मोठ्या हिट चित्रपटांमध्ये दिसली. लीनाचे वडील सैन्यात अधिकारी होते आणि अभिनेत्रीला लहानपणापासूनच चित्रपटांची आवड होती. त्यामुळे ती अभिनयाकडे वळली. लीना १९६७ मध्ये ‘मसिहा’ या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार होती, ज्यामध्ये तिच्याबरोबर सुनील दत्त होते, पण शेवटी तिने १९६८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मन का मीत’मधून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. हा चित्रपट खूप गाजला आणि लीना रातोरात स्टार बनली. त्यांनतर तिने काही चित्रपटांमध्ये काम केले आणि गोव्यातील राजकीय कुटुंबातील सिद्धार्थ बांदोडकरशी लग्न केले.

आणखी वाचा – Video : पापलेट, कोळंबी खेकडे अन्…; नीना कुळकर्णींनी नवऱ्याच्या आठवणीत बनवला खास बेत, माशांवर मारला ताव, व्हिडीओ व्हायरल

लीनाने तिच्या नवीन विवाहित जीवनाचा पुरेपूर आनंद घेण्याआधीच, लग्नाच्या एका वर्षानंतरच तिचा पती सिद्धार्थला एका दुःखद अपघातात आपला जीव गमवावा लागला. यानंतर लीना पूर्णपणे तुटली आणि नंतर हळूहळू किशोर कुमारशी जोडली जाऊ लागली. ती पुन्हा प्रेमात पडली पण त्यांच्या घरच्यांना हे नाते मान्य नव्हते. किशोरने यापूर्वी तीन वेळा लग्न केले होते आणि तो लीनापेक्षा २० वर्षांनी मोठा होता. लीनाच्या या निर्णयाला घरच्यांचा पूर्ण विरोध होता. लीनाने किशोर कुमारशी लग्न केले तेव्हा ती ३० वर्षांची होती आणि किशोर ५० वर्षांचा होता.

आणखी वाचा – १९व्या वर्षी लग्न, ३४ वर्ष सुखाचा संसार; मृणाल कुलकर्णींनी लग्नाच्या वाढदिवसाला शेअर केले खास फोटो, अभिनेत्रीच्या पतीला पाहिलंत का?

१९५१ मध्ये लीनाचा जन्म झाला तेव्हा किशोर कुमार यांनी रुमा गुहा ठाकुरता यांच्याशी पहिले लग्न केले. म्हणजे किशोर कुमारचे पहिले लग्न झाले तेव्हा लीना अवघ्या एक वर्षाची असेल. त्यानंतर दोघेही १९५८ मध्ये वेगळे झाले आणि किशोरने १९६० मध्ये मधुबालासह दुसरे लग्न केले. १९७६ मध्ये त्यांनी योगिता बालीशी लग्न केले आणि १९७८ मध्ये ते वेगळे झाले. त्यानंतर १९८०मध्ये लीना किशोरच्या आयुष्यात आली, पण हे नातेही अभिनेत्रीसाठी सुखावह नव्हते. १९८७ मध्ये किशोर कुमार यांचे निधन झाले आणि लीना पुन्हा एकदा वयाच्या ३७व्या वर्षी विधवा झाली. तिला किशोर कुमारपासून सुमित कुमार हा मुलगा झाला. प्रसिद्धीपासून दूर असलेली ही अभिनेत्री सध्या मुंबईत राहते.

Tags: bollywood actressentertainmentLeena Chandravarkarleena chandravarkar actressLeena Chandravarkar and kishor kumar
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Satvya mulichi satavi mulgi Marathi serial update The family's efforts to prevent the news of Netra becoming a mother from reaching Virochak

नेत्रा आई होणार असल्यामुळे राजाध्यक्ष कुटुंबीय आनंदी, पण ही बातमी विरोचकापर्यंत पोहोचू न देण्याचे घरच्यांचे प्रयत्न

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.