मराठी मालिका व चित्रपटांमधून घराघरांत पोहोचलेला लोकप्रिय चेहरा म्हणजे अभिनेता निखिल राऊत. निखिलने झी मराठी वाहिनीवरील ‘काहे दिया परदेस’, ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकांमधून तसेच फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ अशा चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे. आपल्या अभिनयानं चर्चेत राहणारा हा अभिनेता नुकत्याच त्याच्या बाबा झाल्याच्या बातमीमुळे चर्चेत आला आहे. अभिनेता बाबा झाला असून त्याने ही आनंदाची बातमी नुकतीच सोशल मीडियाद्वारे आपल्या चाहत्यांबरोबर शेअर केली आहे.
अभिनेता निखिल राऊतला २७ मेला गोंडस मुलगा झाला आहे. या नवजात गोड बाळाबरोबरचे फोटो शेअर करत निखिलने आनंदाची बातमी दिली आहे. “आमच्या छोट्याशा सुपरस्टारचं स्वागत” असं म्हणत त्याने हे फोटो शेअर केले आहेत. तसेच या फोटोखाली त्याने “आमच्या लाडक्या बाळाच्या आगमनाची घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे, ज्याने २७ मे रोजी जन्म घेतला. कृपया त्याला तुमचे आशीर्वाद आणि प्रेम द्या. विनम्र अभिवादन, मयुरी आणि निखिल राऊत” असंही म्हटलं आहे.
आणखी वाचा – रवीना टंडनवर मुंबईत का झाला हल्ला? ‘त्या’ व्हायरल व्हिडीओमागील नेमके सत्य काय? भांडणाचे खरे कारण आले समोर
अभिनेत्याने शेअर केलेल्या पोस्टमध्ये सांताक्रुझमधील रुग्णालयातील डॉक्टरांचे आभारही मानले. त्याने पुढे असे म्हटले आहे की, “आम्ही सूर्या हॉस्पिटल, सांताक्रूझ, पश्चिम येथील वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे आणि विशेषत: डॉ. अमित पत्की सरांचे मनापासून आभार मानू इच्छितो, ज्यांच्या कौशल्याने आणि अथक प्रयत्नांमुळे हा आनंदाचा प्रसंग शक्य झाला. श्री स्वामी समर्थ”.
दरम्यान, निखिलने ही गुडन्यूज शेअर करताच त्याच्यावर चाहत्यांसह मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांकडून शुभेच्छा व कौतुकाचा वर्षाव होत आहे. सुकन्या मोने, राधा सागर, सारिका नवाथे, निलेश साबळे, अदिती द्रविड, धनश्री काडगांवकर, अद्वैत दादरकर, विवेक सांगळे आदी कलाकारांनी त्याला बाबा झाल्यामुळे अभिनंदन म्हटले आहे.