मराठीसह हिंदी प्रेक्षकांवर आपल्या अभिनयाने व सौंदर्याने मोहिनी घालणारी ‘कलरफुल’ अभिनेत्री म्हणजे पूजा सावंत. मराठी मनोरंजन सृष्टीतली ही लोकप्रिय अभिनेत्री नुकतीच विवाहबंधनात अडकली. ‘मन धागा धागा जोडते नवा’ म्हणत पूजाने मराठीसह हिंदी सिनेविश्वातदेखील तिच्या अभिनयाची छाप सोडली आहे. आपल्या अभिनयाने व हटके स्टाईलमुळे चर्चेत राहणारी पूजा तिच्या लग्नामुळे चांगलीच चर्चेत आली. २८ फेब्रुवारी रोजी पूजाने सिद्धेश चव्हाणसह लग्नगाठ बांधली असून आज त्यांच्या लग्नाला ३ महिने पूर्ण झाले आहेत.
आपल्या अभिनयाने चर्चेत राहणारी पूजा तिच्या सोशल मीडियाद्वारेही हरचेत राहत असते. सोशल मीडियावर ती तिचे अनेक स्टायलिश फोटो व व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. तिच्या या फोटोला चाहत्यांकडूनही तुफान प्रतिसाद मिळत असतो. अशातच पूजाने तिच्या लग्नातील लुकचा एक खास फोटो शेअर करत तिच्या लग्नाला तीन महिने पूर्ण झाल्याचे म्हटले आहे.
पूजाने “मिसेस झाल्यानंतरचा पहिला फोटो” असं म्हणत तिच्या लग्नातील लाल साडीमधील फोटो शेअर केला आहे. तसेच लग्नाला तीन महिने पूर्ण झाले असल्याचेही म्हटले. तसेच पूजाने इन्स्टाग्राम स्टोरीवर तिच्या नवऱ्याबरोबरचा फोटोही शेअर केला आहे. “आपण कालच भेटलो असे वाटत आहे’ असं म्हणत पूजाने नवऱ्याबरोबरचा रोमॅंटिक फोटो शेअर केला आहे. पूजा काही दिवसांपूर्वीच भारतात परतली असून ती तिच्या कामावर पुन्हा एकदा रुजू झाली आहे.

आणखी वाचा – ‘आठवी-अ’च्या कलाकारांचा कराड, सांगलीमध्ये हाऊसफुल्ल शो, चाहत्यांची तुफान गर्दी
पूजाने शेअर केलेल्या या फोटोला तिच्या चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्स करत उत्तम प्रतिसाद दिला आहे. त्याचबरोबर अनेकांनी तिला लग्नाला तीन महिने पूर्ण झाल्यानिमित्त शुभेच्छाही दिल्या आहेत. दरम्यान, पूजाचा होणार नवरा सिद्धेश चव्हाण सध्या भारतात राहत नसून ऑस्ट्रेलियातील एका फायनान्स कंपनीत काम करतो. मात्र तो मूळचा मुंबईचा आहे. कामानिमित्त तो काही काळ ऑस्ट्रेलियात राहत आहे.