शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘पंचायत’ ते ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’, या आठडव्यात ओटीटीवर प्रेक्षकांसाठी चित्रपट व सीरिजचा खजिना, वाचा संपूर्ण यादी

Saurabh Moreby Saurabh More
मे 27, 2024 | 1:51 pm
in Entertainment
Reading Time: 7 mins read
google-news
Panchayat 3, Swatantryaveer Savarkar and Illegal 3 will be released in this week of May.

‘पंचायत’ ते ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’, या आठडव्यात ओटीटीवर प्रेक्षकांसाठी चित्रपट व सीरिजचा खजिना, वाचा संपूर्ण यादी

ओटीटीवर दर आठवड्याला नवीन काहीतरी चित्रपट किंवा सिरिज प्रदर्शित होतंच असतात. ओटीटीवर अ‍ॅक्शन, ड्रामा, रोमान्स अशा सगळ्या आशयाचे नवीन चित्रपट किंवा वेबसीरिज प्रदर्शित होत असतात. अशातच येत्या आठवड्यात ओटीटी वापरकर्त्यांसाठी चित्रपट व वेबसिरीजची पर्वणी असणार आहे. दर्जेदार विषयांमुळे त्याचबरोबर त्या विषयांमधील विविधतेमुळे ओटीटीवरील चित्रपट व सीरिजची मागणी गेल्या काही वर्षांत चांगलीच वाढली आहे. कारण या ओटीटीमुळे जगभरातून कुठलाही चित्रपट किंवा सीरिज अगदी सहजरीत्या घरी बसून पाहता येतात. हे नवीन चित्रपट आणि वेबसिरीज कोणत्या आहेत, जाणून घ्या…

पंचायत ३ : ‘पंचायत’च्या तिसऱ्या सीझनची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहे. या सीरिजचे आतापर्यंत दोन सीझन आले असून या दोनहे सीझनला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. अशातच आता या सीरिजचा नवीन सीझन येत्या २८ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. फुलेरा गावाची कथा, सरपंच, सचिव आणि बनराकस पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाले आहेत. यावेळी मंजू देवी निवडणूक लढवणार असून नवीन सचिव आल्याने जुन्या सचिवासाठी अनेक अडचणी निर्माण होणार आहेत. ‘प्राइम व्हिडीओ’ या ओटीटी माध्यमावर ही सीरिज पाहता येऊ शकते.

View this post on Instagram

A post shared by prime video IN (@primevideoin)

इल्लीगल ३ : ‘इल्लीगल’ या वेब सीरिजच्या दोन्ही सीझनला प्रेक्षकांकडून प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद मिळाल्यानंतर या सीरिजचा तिसरा सीझनही प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. येत्या २९ मे रोजी ‘जिओ सिनेमा’ या ओटीटी माध्यमावर ही सीरिज प्रदर्शित होणार आहे. नेहा शर्मा, पियुष मिश्रा, अक्षय ओबेरॉय, नील भूपलम आणि सत्यदीप मिश्रा यांच्याशिवाय यात अनेक कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या सीरिजचे पहिले दोन सीझन गाजल्यानंतर आता या सीरिजच्या तिसऱ्या सीझनची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहे.

View this post on Instagram

A post shared by JioCinema (@officialjiocinema)

आणखी वाचा – धक्कादायक! सुप्रसिद्ध अभिनेत्याची रस्त्यावरच गोळ्या झाडून हत्या, चोरी करण्याच्या हेतूने घेरलं अन्…; नेमकं काय घडलं?

स्वातंत्र्यवीर सावरकर : रणदीप हुड्डाचा ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चित्रपट चित्रपटगृहांनंतर ओटीटीवर रिलीज होण्यास सज्ज झाला आहे. चित्रपटगृहामध्ये या चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळाल्यानंतर हा चित्रपट आता ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. वीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटात रणदीप हुड्डा मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट हिंदीसह मराठीमध्येही प्रदर्शित झाला होता. ‘झी ५’ या ओटीटी माध्यमावर हा चित्रपट येत्या २८ मे रोजी प्रदर्शित होणार आहे.

View this post on Instagram

A post shared by ZEE5 (@zee5)

आणखी वाचा – “बेडरुममध्ये मुलासह मला वडिलांनी पकडलं अन्…”, जान्हवी कपूरचा वैयक्तिक आयुष्याबाबत मोठा खुलासा, म्हणाली, “वडील आले तेव्हा…”

एटलास : हॉलिवूड अभिनेत्री जेनिफर लोपेझचा अमेरिकन सायन्स फिक्शन ॲक्शन थ्रिलर चित्रपट ‘एटलस’ नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे. ब्रॅड पेटन दिग्दर्शित या चित्रपटात जेनिफर व्यतिरिक्त सिमू लिऊ, स्टर्लिंग के. ब्राउन, ग्रेगरी जेम्स कोहान, अब्राहम पॉप्युला, लाना पॅरिला आणि मार्क स्ट्राँग यांच्या भूमिका आहेत.

Tags: Illegal 3ott newsPanchayat 3Swatantraveer Savarkar
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Aai Kuthe Kay Karte Promo

अभिषेक अडचणीत असताना मदतीसाठी अरुंधतीचा नकार, दोघांनीही मायलेकाच्या नात्याचा मांडला हिशोब, नको नको ते बोलले अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.