‘ठरलं तर मग’ मालिकेत गेल्या काही एपिसोडपासून सायली-अर्जुन यांच्यामधील दुरावा पाहायला मिळतो आहे. हा ट्रॅक संपल्यानंतर सायली-अर्जुन असा निर्णय घेणार आहेत की, लग्नाचं कॉन्ट्रॅक्ट संपलं तरी ते परस्पर सहमतीने एकत्र राहतील. अर्जुनने सायलीला सुभेदारांच्या घरीच राहण्याची विचारणा केल्याबद्दलचा प्रोमोही काही दिवसांपूर्वी समोर आलेला. यावर अर्जुनने सायलीला मधुभाऊंना जेलमधून सोडवून आणेपर्यंत आपण एकत्र राहू असं म्हटलं होतं. त्यामुळे ते दोघे मिळून आता मधूभाऊंना सोडवण्यासाठीचे प्रयत्न करत आहेत.
अशातच ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या आजच्या भागात तापातून बरं वाटल्यामुळे अर्जुन सायलीला स्वयंपाकघरात मदत करतानाचे पाहायला मिळाले. सर्व सुभेदार कुटुंबियांना अर्जुन स्वतःच्या हाताने नाश्ता वाढतो. तर दुसरीकडे महीपतकडे मोबाईल आहे हे मधुभाऊ बघतात आणि हवालदार शेवडेंना सांगतात. हवालदार शेवडे महीपतला मोबाईल नीट ठेवायला सांगतो, त्यावर महीपत मधुभाऊंचा कार्यक्रम उरकायची भाषा करतो.
तर दुसरीकडे अर्जुन-सायली मधुभाऊंना भेटायला जेलमध्ये येतात. मधुभाऊ महीपतकडे मोबाईल बघितला असून ते हवालदार शेवडेंना सांगितल्याचं अर्जुन सायलीच्या कानावर घालतात. अर्जुन मधुभाऊंना महीपतकडे मोबाईल आहे म्हणजे साक्षी बाहेरून त्याला मदत करत आहे असं सांगून सावध करतो. तर एकीकडे चैतन्य घरात साक्षी नसून पुरावे शोधता येतील असं अर्जुनला फोनवर कळवतो, त्यावर अर्जुनही लगेच सायलीला घेऊन येत असल्याचा होकार कळवतो.
आणखी वाचा – नेत्राच्या हातून होणार विरोचकाचा अंत, शक्तीही कामी येईना अन्..; शेखर राजाध्यक्षने दिला अंताचा इशारा
अर्जुन-सायली महीपतच्या घरी चैतन्यला भेटून लगेच पुरावे वेगवेगळ्या खोलीत शोधू लागतात. दुसरीकडे साक्षी महीपतला जेलमध्ये भेटून अर्जुन व सायली यांच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल माहिती देते. तर इथे अर्जुन, सायली व चैतन्य महीपतच्या घरी पुराव्यांचा शोध सुरूच ठेवतात. त्यामुळे आता पुढील भागात चैतन्य अर्जुन-सायलीला मधु भाऊंच्या केसबद्दलचे साक्षीविरोधातले अत्यंत महत्वाचे पुरावे दाखवतो आणि त्यावर अर्जुन साक्षीचा पर्दाफाश करण्याचं ठरवतो.