‘ये देख साले ये देख’ हे वाक्य ऐकल्यावर जे नाव तुमच्या आमच्या सारख्यांच्या मनात येत ते म्हणजे नाना पाटेकर. ना ना कलेच्या अदाकारीने परिपूर्ण असलेले नाना पाटेकर हे आज मनोरंजन विश्वातील एक मोठं प्रस्थ ठरलं आहे. साधं राहणीमान असाध्य दर्जाचा अभिनय ही नाना पाटेकर यांची खरी ओळख आहे असं म्हणायला हरकत नाही. अनेक हिंदी मराठी चित्रपटांमध्ये काम करून नानांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. सुरुवातीच्या काळात अगदी ३ ते ४ हजारांमध्ये देखील त्यांनी चित्रपटांमध्ये काम केले. जशी जशी वेळ बदलत गेली तसा तसा नानांचा अभिनय बहरत गेला.(Nana Patekar Real Name)
नाना पाटेकर यांच्या फार मुलाखती आपल्याकडे उपलब्ध आहेत त्यापैकी एका मुलाखती दरम्यान नाना पाटेकर यांनी त्यांच्या आयुष्यातील काही महत्वाच्या गोष्टी शेअर केल्या आहेत. एका मुलाखतीत नाना पाटेकर यांच्या नावा बद्दल त्यांनी खुलासा केला आहे. नाना पाटेकर यांचे वडील हे कामानिमित्त मुंबईला असायचे आणि नाना आईसोबत गावी मुरुड जंजिऱ्याला असायचे. नाना शाळेला ही तिथेच होते त्यावेळी त्यांचं नाना पाटेकर यांचं खरं नाव होत ‘विश्वनाथ’. गावाकडे सगळे नानांना विश्वनाथ या नावानेच ओळखायचे तर शाळेत नानाचे मित्र त्यांना ‘विसू’ म्हणून हाक मारायचे. पण नानांची आई मात्र त्यांना प्रेमाने नाना म्हणूनच हाक मारायची.
हे देखील वाचा – “पुन्हा असली कामं करू नकोस रे बाबा!” जेव्हा काम बघून आई नानांना म्हणाल्या…

आज महाराष्ट्रभर गाजतंय नाव…(Nana Patekar Real Name)
पुढील शिक्षणासाठी नाना पाटेकर यांनी मुंबई जवळ केली. मुंबईतील ;जे. जे. स्कूल ऑफ आर्ट’ मध्ये नाना पाटेकर यांनी ऍडमिशन घेतले तेव्हा पासून त्यांनी सर्व कागद पात्रांवर नाना हे नाव लावायला सुरुवात केली. आणि पुढे मुंबईचं काय तर संपूर्ण महाराष्ट्र त्यांना नाना या नावाने ओळखू लागला. मुंबईत राहताना, शिकताना, अभिनयाच्या विश्वात जॅम बसवताना मिळणारा प्रत्येक व्यक्ती त्यांना नाना याचं नावाने ओळखू जाऊ लागला.
अभिनया व्यतिरिक्त ते समाजकार्यातही अग्रेसर आहेत. आजवर नानांच्या नावावर बरेच अवार्ड आहेत. मात्र या सर्व अवार्डमधील लक्षवेधी अवार्ड म्हणजे नानांच पहिलं नॅशनल अवॉर्ड म्हणून ‘परिंदा’ चित्रपटातील भूमिकेसाठी मिळालेल ‘बेस्ट सपोर्टींग ऍक्टर’ आहे. अर्थात असे म्हणण्याचे कारणही तसेच आहे. ‘परिंदा’, ‘क्रांतिवीर’, ‘अपहरण’, ‘पक पक पकाक’, ‘देऊळ’, ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे’, ‘नटसम्राट’, ‘आपला माणूस’ या चित्रपटातून नानांनी विविधरंगी भूमिका केलेल्या आहेत. नानांच्या अभिनयाने साऱ्या रसिक प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतलाय.
