बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या तिच्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षणांमध्ये आहे. अभिनेत्री गर्भवती आहे. सप्टेंबर महिन्यात ती तिच्या बाळाला जन्म देणार आहे. त्यामुळे ती सध्या तिच्या आई होण्याच्या खास क्षणांचा आनंद उपभोगत आहे आणि यात तिला तिचा साथीदार म्हणजेच तिचा नवरा आणि प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह उत्तम साथ देत आहे. काही दिवसांपूर्वी दीपिका व रणवीर यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये हे जोडपे एकमेकांचा हात धरत चालताना दिसले. या खास प्रसंगी रणवीर पत्नी दीपिकाची पूर्ण काळजी घेताना दिसला.
चाहत्यांच्या गर्दीतून जाताना रणवीर आपल्या पत्नीला अगदी सांभाळून घेऊन जाताना दिसला. तिला कुणाचाही धक्का लागू नये याचीही तो संपूर्ण काळजी घेत असल्याचे पाहायला मिळाले. अशातच रणवीर-दीपिका यांचा आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये दीपिकाचं बेबी बम्प दिसत आहे. पहिल्यांदाच अभिनेत्रीने तिचा बेबी बम्प दाखवला आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्रीने पांढऱ्या रंगाचा शर्ट व जीन्स पॅंट घातली असल्याचे पाहायला मिळत आहे, तर रणवीर तिला गर्दीतून सावरत घेऊन जात असल्याचे पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा – Video : साताऱ्यात ‘पारू’चं शूट करत असताना बायकोच्या आठवणीत प्रसाद जवादे व्याकुळ, अमृता म्हणाली, “तू माझा…”
या व्हिडीओखाली रणवीर-दीपिका यांच्या अनेक चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. या व्हिडीओखाली “दोघांमध्ये किती प्रेम पाहायला मिळत आहे”, “यांना निरोगी बाळ व्हावे याच सदिच्छा”, “म्हणून रणवीरला काळजी घेणारा नवरा म्हणतात” अशा अनेक कमेंट्स या व्हिडीओखाली नेटकऱ्यांनी केल्या आहेत. काही दिवसांपूर्वी दीपिका व रणवीर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे लवकरच दोघे आई-बाबा होणार असल्याची बातमी शेअर केली होती.
आणखी वाचा – मुलगा झाला हो! यामी गौतम झाली आई, नावही केलं जाहीर, म्हणाली, “आमच्या मुलाच्या”
दरम्यान, त्यांनी शेअर केलेल्या या पोस्टमध्ये दीपिका सप्टेंबर २०२४ मध्ये बाळाला जन्म देणार असल्याचं म्हटलं होतं. रणवीर-दीपिका यांची हटके लव्हस्टोरी ‘गोलियों की रासलीला राम-लीला’ या चित्रपटापासून सुरु झाली. या चित्रपटात दोघांनी पहिल्यांदा एकत्र काम केले होते. त्यानंतर दोघे ‘बाजीराव-मस्तानी’ व ‘पद्मावत’ या चित्रपटात एकत्र झळकले. सहा वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर रणवीर-दीपिकाने १४ नोव्हेंबर २०१८ रोजी लग्नगाठ बांधली.