दर्जेदार विषयांमुळे त्याचबरोबर त्या विषयांमधील विविधतेमुळे ओटीटीची मागणी गेल्या काही वर्षांत चांगलीच वाढली आहे. कारण या ओटीटीमुळे जगभरातून कुठलाही चित्रपट किंवा सीरिज अगदी सहजरीत्या घरी बसून पाहता येतात. काही कारणांमुळे तुम्हाला चित्रपटगृहांत प्रदर्शित झालेले चित्रपट पाहता आले नसतील तर येत्या आठवड्यात तुम्ही ओटीटीवर ही चित्रपट व काही सीरिज घरबसल्या पाहू शकता.
बाहुबली : क्राउन ऑफ ब्लड : हा अमरेंद्र बाहुबली आणि भल्लालदेवाच्या सुरुवातीच्या कारनाम्यांचा शोध घेणाऱ्या प्रतिष्ठित चित्रपटाची ॲनिमेटेड सीरिज आहे. ही सीरिज तुम्हाला साम्राज्यांच्या संघर्षाच्या एका महाकाव्य प्रवासात परत घेऊन जाण्यासाठी सज्ज आहे, जिथे बाहुबली आणि भल्लालदेव महिष्मतीच्या महान राज्याचे आणि त्यांच्या सर्वात मोठ्या धोक्यापासून सिंहासनाचे संरक्षण करण्यासाठी एकत्र येतानाचे पाहायला मिळतात. ग्राफिक इंडिया आणि अर्का मीडियावर्क्स प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेड निर्मित आणि दूरदर्शी चित्रपट निर्माते एसएस राजामौली, शरद देवराजन आणि शोबू यारलागड्डा, जीवन जे. कांग आणि नवीन जॉन यांनी दिग्दर्शित आणि निर्मीत केलेली ही सीरिज १७ मे, २०२४ रोजी Disney+Hotstar वर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे.
बस्तर द नक्षल स्टोरी : सुदीप्तो सेन दिग्दर्शित आणि विपुल अमृतलाल शाह निर्मित हा हिंदी भाषेतील राजकीय थ्रिलर चित्रपट आहे. यात अदा शर्मा मुख्य भूमिकेत आहे आणि तिच्याशिवाय यात इंदिरा तिवारी, विजय कृष्णा, शिल्पा शुक्ला, यशपाल शर्मा, सुब्रत दत्ता आणि रायमा सेन देखील आहेत. हा चित्रपट १५ मार्च २०२४ रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला होता. अशातच आता हा चित्रपट ओटीटीवरदेखील प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. येत्या १७ मे रोजी Zee-5 या ओटीटी माध्यमावर हा चित्रपट पाहता येणार आहे.
आणखी वाचा – बायकोच्या वाढदिवसानिमित्त समीर चौघुलेंची खास पोस्ट, एकत्र फोटोही शेअर केला, म्हणाले, “तुझ्याविना माझं…”
जरा हटके जरा बचके : ‘जरा हटके जरा बचके’ हा २०२३चा हिंदी भाषेतील रोमँटिक कॉमेडी चित्रपट आहे. ज्यामध्ये विकी कौशल आणि सारा अली खान प्रमुख भूमिकेत आहेत. चित्रपटाची कथा एका छोट्या शहरातील जोडप्याभोवती फिरते ज्यांना स्वतःचे घर हवे आहे. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केले आहे. हा चित्रपट गेल्यावर्षी २ जून २०२३ रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला होता. चित्रपटाला प्रेक्षकांकडून कक्षहानगलाच प्रतिसाद मिळाला होता. १२ मे रोजी हा चित्रपट Jio Cinema या ओटीटी माध्यमावर पाहू शकता.
आणखी वाचा – विरोचकाच्या मृत्युपेक्षा त्याच्याबरोबरचे जीवघेणे खेळ यशस्वी ठरणार का?, देवीआई भक्तांच्या हाकेला धावणार का?
गॉडझिला एक्स काँग : द न्यू एम्पायर : ‘गॉडझिला एक्स काँग: द न्यू एम्पायर’ हा ॲडम विंगर्ड दिग्दर्शित आणि लिजेंडरी पिक्चर्स द्वारे निर्मित आणि वॉर्नर ब्रदर्स द्वारे वितरीत केलेला एक अमेरिकन मॉन्स्टर चित्रपट आहे. यात रेबेका हॉल, ब्रायन टायरी हेन्री, डॅन स्टीव्हन्स, कायली हॉटल, ॲलेक्स फर्न्स आणि फाला चेन प्रमुख भूमिकेत आहेत. Amazon Prime वर १३ मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.