‘पारू’ मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, अहिल्यादेवींना धमकी आलेली असते त्यामुळे त्या जरा काळजीतच असतात. तर इकडे ऑफिसमध्ये माजी मंत्री सूर्यकांत कदम यांचा पीए अहिल्यादेवींच्या ऑफिसमध्ये येतो आणि त्याला तातडीने अहिल्यादेवींना भेटायचं असतं मात्र अहिल्यादेवी त्याच्या आधी आलेल्या गावकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून त्यांना आधी भेटतात आणि नंतर कदम यांच्या पीएला भेटतात. कदम यांच्या पीएला त्या वेळ नसल्याचे सांगतात आणि त्या तीनदा त्याला जायला सांगतात. मात्र तो काही जात नाही आणि सांगतो तुम्ही उद्या तीन वाजताची मीटिंग फिक्स करून टाकतो. (Paaru Serial Update)
यावर अहिल्यादेवी स्वतः उठतात आणि त्याच्या सणसणीत कानाखाली लगावतात आणि सांगतात की, अहिल्यादेवी या एकदाच बोलतात मात्र तुझं भाग्य इतकं चांगले आहे की, मी तुला तीनदा जायला सांगितले त्यानंतर तो तिथून निघून जातो आणि जाता जाता सांगतो की, हे तुम्हाला महागात पडेल. तर इकडे पारू आदित्य प्रीतम दिशा सगळेजण असतात, तेव्हा दिशाची मैत्रीण येते आणि ती आदित्य व प्रीतमला भेटते. त्यानंतर जाता जाता ती दिशाला असेही म्हणते की, इतका imature नवरा कसा निवडला, तुझी चॉईस अशी असेल असं मला वाटलं नव्हतं, हे ऐकल्यावर दिशाचा चेहराच पडतो. त्यानंतर इकडे अहिल्यादेवी मोहन व श्रीकांतशी बोलत असतात तेव्हा श्रीकांत अहिल्याला म्हणतो की, मी सूर्यकांत कदमचा पीए ऑफिसमध्ये आलेला असं ऐकलं मी बोलू का त्याच्याशी.
यावर अहिल्यादेवी म्हणते की, नाही हा गुंता मी सोडवते. पोलीस तक्रार वगैरे काही करायची गरज नाही आहे. जर आपण असं काही केलं तर त्याला असं वाटेल की, आपण हालचाल करत आहोत. त्यामुळे त्याचीही हालचाल वाढेल आणि तो कोणत्या थराला जातो हे मला बघायचं आहे. त्यामुळे मी आता नाही तर योग्य वेळी मी त्याचा काय तो बंदोबस्त करेनच, असं म्हणतात. तर इकडे आदित्य प्रीतम सगळे हॉटेलला पोहोचलेले असतात. हॉटेलला पोहोचल्यानंतर इकडे लक्षात येते की, प्रीतमने रूम बुक केलेली नसते. तेव्हा सगळ्यांचा संताप होतो सगळेच दमून भागून आलेले असतात त्यानंतर हॉटेलवाला माणूस सांगतो की, आमच्याकडे एकही रूम नाही आणि इथून पुढे कुठेही हॉटेलही नाही आणि इथून पुढे गेला तर आता या रात्रीच्या वेळी खूप मोठा धोका असण्याची शक्यता आहे. त्यामुळे तो हॉटेलवाला दादा हॉटेलच्या मागे असलेल्या गोठ्या जवळची काही जागा आहे. तिथे तो त्यांना झोपायला सांगतो पण त्या जागेत प्रचंड आवरावर करायची गरज असते सगळीकडे गवत वगैरे पडलेलं असतं, ते पाहून दिशाचा पारा चढतो. दिशा म्हणते की, मी गाडीत एसी लावून झोपते तुम्हाला काय करायचे ते करा असं म्हणून ती तिथून निघून जाते.
तर इकडे पारू सगळं आवरू लागते आणि पारू सांगते की, मी हे सगळं आवरते, तुम्ही दोन मिनिट शांत बसून रहा. तितक्यात लाईट जाते. पारू गणीला म्हणते की, गणी तू आहेस तिथेच उभा राहा, नाहीतर कुठेतरी धडपडशील. तर आदित्य पारुला सांगतो की, तू पण जिथे आहेस तिथेच थांब नाहीतर तू ही पडशील. मी येतो असं म्हणत आदित्य पारूजवळ जातो आणि तितक्यात त्याच्या पायाला धक्का लागून तो पारूबरोबर गवतात पडतो. आता त्यांचा हा रोमँटिक अंदाज लक्षात येऊन आदित्यला पारूच्या प्रेमाची जाणीव होणार का?, हे सर्व पाहणं रंजक ठरेल.