मुलं लहान असताना ती नीट जेवत नाहीत अशी प्रत्येक आईची तक्रार असते. बरेचदा आपल्या मुलांनी नीट जेवावं म्हणून वेगवेगळे पदार्थ बनवतात. पण हे पदार्थ मुलं आवडीने खातील याची शाश्वती नाही. मुलांचा आहार योग्य झाला नाही की प्रत्येक आईला टेंशन येतं. त्यामुळे बरेचदा मुलांची वाढही खुंटते. न आवडणार जेवण हे मुलांच्या विकासात अडथळा आणू शकतात. त्यामुळे ही लक्षण मुलांमध्ये Food aversion ची सुरुवात असल्याचं दर्शवितात. (Food aversion Symptoms)
१. २० पेक्षा म्हणजे (भात भाजी चपाती फळ) असे मोजून खूप कमी पदार्थ नेहमी खाणे किंवा ते पदार्थ आवडणे. नवीन पदार्थ मुलांना अचानक दिला तर तो ते खाण्यास नकार देतात. वेगळं असं ताटात पाहिलं की नाही म्हणतात.
२. वेगवेगळ्या Textures reject करणे. पातळ,कडक,मऊ,semisolid असे अन्न न खाता फक्त एकच texture चे खाणे आणी इतरांना नकार देणे. उदा: सतत पातळ खाणे कडक चपाती वगरे किंवा भात न खाणे.
३. जेवताना टंगळ मंगळ करत जेवणे. निवांत कसंतरी चघळणे. यामुळे खाण्याला काहीच तारतम्य राहत नाही. खाण्याचं वेळापत्रक राहत नाही. पचन क्रिया ही मंदावते.
४. जेवताना श्वास घेताना व पाणी पिताना त्रास होणे, म्हणजेच motor skill develop न झाल्यामुळे हे घडू शकते.
५. जेवताना उलटी करणे किंवा सतत उलटी करण्याचे प्रमाणे वाढणे.
६. खूप हळूहळू वजन वाढणे. पूरक आहार न गेल्यामुळे तसेच प्रॉपर न्यूट्रिशन न मिळाल्यामुळे वजन कमी राहणे.
ही सगळी food aversion ची लक्षण आहेत. ही लक्षणे बालकांमध्ये आढळत असल्यास लवकरात लवकर काळजी घ्यावी.
टीप : वरील दिलेल्या माहितीची इट्स मज्जा पुष्टी करत नाही. तुम्ही तुमच्या ओळखीच्या डॉक्टरांचा यासंदर्भात अवश्य सल्ला घ्या.