‘कॉमेडी क्वीन’ भारती सिंहला कोण ओळखत नाही? तिने आपल्या अभिनयाच्या जोरावर संपूर्ण भारताला हसायला लावले. अंके कॉमेडी शॉमधून ती प्रेक्षकांच्या समोर आली होती. त्यानंतर ती ‘द कपिल शर्मा’शो मध्येही दिसून आली होती. तसेच ती सोशल मीडियाच्या माध्यमातूनदेखील नेहमी प्रेक्षकांचे मनोरंजन करत असते. तिने लेखक हर्ष लिंबाचियाबरोबर लग्न केले होते. त्यानंतर तिने एका मुलालादेखील जन्म दिला. हर्ष व भारती हे दोघेही आपल्या मजेशीर स्वभावाने सर्वांचेच मनोरंज करताना दिसतात. पण अशातच आता भारतीच्या तब्येतीबद्दलची एक अपडेट समोर येत आहे. (bharti singh admitted in hospital)
सध्या भारती ‘डान्स दिवाने सीजन 4’ च्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे. पण तिला आता कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिच्यावर आता रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तिने केलेल्या व्लॉगच्या माध्यमातून ही माहिती स्वतः दिली आहे. तिने आपल्या व्लॉगमध्ये पोटात दुखत असल्याचे सांगितले असून सुरुवातीला पोटात गॅस झाला आहे असे समजून टाळाटाळ केली. मात्र जेव्हा दुखणं खूप वाढलं तेव्हा डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा ठरवलं. त्यानंतर ती रुग्णालयात भरती झाली आणि तिथे तिच्या विविध टेस्ट केल्या गेल्या. टेस्ट केल्यानंतर पित्ताशयामध्ये गाठी झाल्याने पोटदुखी सुरु झाल्याचे समोर आले.
तिने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये आरती खूप भावनिक झाल्याचे दिसून आले. या व्लॉगमध्ये तिने माफी मागत रुग्णालयातून व्हिडीओ शूट करत असल्याचे सांगितले. तिने आपल्या व्हिडीओमध्ये सांगितले की, “गेल्या तीन दिवसांपासून माझ्या पोटात खूप दुखत आहे. या दुखण्यामुळे मी रात्रीची झोपू शकत नव्हते. माझ्यामुळे हर्षदेखील झोपू शकला नाही. मी रुग्णालयात भरती झाल्यापासून कुटुंबातील प्रत्येक सदस्य मला भेटलायला रुग्णालयात आला. तसेच माझ्यावर होणारी शस्त्रक्रिया ही छोटी आहे. त्यामुळे अधिक चिंता करण्याचा विषय नाही”.
आणखी वाचा – दहावीत असताना पहिलं ब्रेकअप अन्…; विशाखा सुभेदारांचा खासगी आयुष्याबाबत खुलासा, म्हणाल्या, “प्रेमपत्र दिलं…”
तसेच पुढे ती मुलांबद्दल म्हणाली की, “मला जेव्हा रुग्णालयात आणले तेव्हा माझा मुलगा झोपला होता. पण जेव्हा जेव्हा मी घरी नसते तेव्हा गोला मला संपूर्ण घरभर मला शोधत असतो. त्यानंतर मात्र ती खूप भावनिक होते आणि रडू लागते”.
तिने शेअर केलेल्या व्हिडीओवर तिचे चाहते ती ‘लवकर बरी व्हावी’ अशा प्रतिक्रिया देत आहेत. तसेच अनेक जण ती बरी व्हावी अशी प्रार्थनादेखील करत आहेत.