मनोरंजन विश्वात अनेक अभिनेते, अभिनेत्री आहेत ज्या आज स्वतःच्या हिमतीवर उभ्या आहेत परंतु आजही त्यांना समाजातील काही व्यक्तींकडून नाहक मानसिक त्रासाला सामोरं जावं लागतं आहे. असच घडलय मराठी अभिनेत्री सुरभी भावे सोबत. सोशल मीडिया वरून एका व्यक्तीकडून सुरभी ला अश्लील व्हिडिओची मागणी करण्यात येत होती परंतु आता सुरभी ने सहन न करता त्या व्यक्तीला चांगलाच धडा शिकवला आहे. सुधीर टाकळकर अस त्रास देणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे.(Surbhi Bhave Harassment)
या संदर्भात फोटो पोस्ट करत सुरभी ने माहिती दिली आहे. तिच्या ऑफिशियल इंस्टाग्राम अकाउंट वरून पोस्ट करत कॅप्शन मध्ये लिहिलं आहे ‘ह्या @sudhirtakalkar ह्यांनी मला अनेकवेळा अश्लील विडिओ पाठवले पण मी सतत दुर्लक्ष केले पण ह्या दोन दिवसांत पुन्हा पाठवले मग मी रिप्लाय दिला, जो रिप्लाय दिला तो सुद्धा ह्यात आहे…. त्यांच्या आईचा ह्यात अवमान करणे हा उद्देश नव्हता पण त्यांना झोंबल ते. … अशा समस्त पुरुष वर्गाला सांगते, ” तुमची आई बहिण ही स्त्री आणि बाकी बायका काय तुमच्या मालकीच्या असतात का नीच लोकहो ” ?? इथून पुढे असे मेसेजेस केले तर प्रत्येकाला असंच स्क्रीनशॉट पोस्ट करून सामाजिक नागडा केले जाईल ह्याची नोंद घ्यावी P.S. ह्याहून मला सभ्य भाषा वापरता येत नाही’.

अनेकवेळा असा मानसिक त्रास दिल्याचा खुलासा सुरभी ने या पोस्ट मधून केला आहे तर सायबर क्राईम कडे देखील या संबंधित तक्रार दिल्याचं म्हणलं आहे. तुमच्या आई बहिणी स्त्री आणि बाकी बायका तुमच्या मालिकेच्या आहेत का असे खडेबोल सुनावत सुरभी ने संबधित व्यक्तीची शाळा घेतली आहे.(Surbhi Bhave Harassment)
=====
हे देखील वाचा –जगतगुरु संत तुकाराम महाराजांची भुमिका साकारणार अभिनेता सुबोध भावे लूक चा फोटो चर्चेत
=====
अशी खरमरीत पोस्ट लिहीत सुरभी ने या व्यक्तीबद्दली माहिती पोलिसांसोबतच सामान्य जनतेसोबत ही शेअर केली आहे. सुरभी ने दिलेल्या खरमरीत उत्तराच चाहत्यांकडून, अनेक कलाकारांकडून कौतुक करण्यात आलं आहे. तर असल्याना कठोर शासन करण्याची ही मागणी बऱ्याच चाहत्यांनी केली आहे.