भाग्य दिले तू मला या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे पात्र कोणतंही असो प्रेक्षकांकडून कौतुकाचा हक्क सगळ्यांना मिळाला आहे. खूप कमी मालिका अशा असतात ज्या कमी काळात प्रेक्षकांच्या जवळ पोहचतात भाग्य दिले तू मला हि मालिका याच यादीत येते. सध्या मालिकेत राज कावेरीच्या लग्नाचा ट्रॅक पार पडला. बऱ्याच अडचणींचा सामना केल्या नंतर अखेर राज कावेरीचं लग्न अगदी थाटात पार पडलं. आता मात्र एक नवीन संकट राज कावेरी समोर आल्याचं दिसत आहे.(Bhagya dile tu mala)
भाग्य दिले तू मला आता अतिशय रंजक वळणावर येऊन ठेपली आहे. पुढे नक्की काय होणार याची प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे. भाग्य दिले तू मला या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांची मनं जिंकली. या कार्यक्रमातील कलाकार आणि कथा यामुळे मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली. मालिकेतील राज आणि कावेरी यांची जोडीही प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. पण सध्या या मालिकेत मोठं रंजक वळण आलं असून रत्नमाला यांची प्रकृती खालावलेली पाहायला मिळते.(Bhagya dile tu mala)
====
हे देखील वाचा- भाग्य दिले तू मला मालिकेत नवीन वळण प्रेक्षकांचं आवडतं पात्र घेणार मालिकेतून निरोप?
====
मालिकेत येणार नवं वळण?(Bhagya dile tu mala)
मालिकेत सुरू असलेल्या कथानकानुसार, रत्नमाला या सध्या आजारी असून त्यांची प्रकृती ही खूप खालावली आहे. रत्नमाला या ICU मध्ये असून राज कावेरी हे त्यांची काळजी घेत आहेत. तर नुकतंच समोर आलेल्या प्रोमोमध्ये राज हा हॉस्पिटलमध्ये भावुक होत, आई तू मला आधी का नाही सांगितलं?, आपण आमचं लग्न नंतर केलं असत?, पहिले तुझा इलाज केला असता असा बोलतो, तेव्हा माझ्या जिवापेक्षा जास्त मला तुम्ही एकत्र येणं आणि तुझं लग्न हे महत्त्वाचं होत,असं त्या म्हणतात. रत्नमाला यांना झालेला आजार हा अद्यापही समोर आला नाही.(Bhagya dile tu mala)

पण नुकतंच प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये रत्नमाला यांना किडनीची गरज असते, राज कावेरीची मदत करण्यासाठी आणि रत्नमाला यांचा जीव वाचविण्यासाठी एक अनोळखी व्यक्ती त्यांची मदत करण्यासाठी हॉस्पिटल मध्ये येतो, पण राजचे काका हे त्या व्यक्तीस किडनी देऊ नको. मी तुला १० लाख रुपये देतो असं म्हणतात. तर काकांच्या या जाळ्यात अडकून तो व्यक्ती रत्नमाला यांना किडनी देण्यास नकार देईल का ? तर कावेरी रत्नमाला यांचा जीव वाचविण्यासाठी स्वतःची किडनी रत्नमाला यांना देणार का? हे पाहणं रंजक ठरेल.