छोट्या पडद्यावरील ‘रंग माझा वेगळा’ ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. या मालिकेचं हटके कथानक प्रेक्षकांना भावलं असल्यांन ही मालिका नेहमी टीआरपीमध्ये पहिल्या स्थानकावर असल्याचं दिसते. या मालिकेतील दीपा आणि कार्तिक यांची जोडी आणि चिमुकल्या कार्तिकी आणि दीपिका यांनीही प्रेक्षकांची मनं जिंकली. अश्यातच या मालिकेचं कथानक १४ वर्ष पुढे गेलंअसून या मालिकेत मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय.(Rang Maza Vegla)
रंग माझा वेगळा या मालिकेचं बदललेलं कथानक आणि मालिकेचा नवा प्रोमो नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला. या प्रोमोमध्ये साक्षीच्या खुनाचा आरोप हा कार्तिकवर आला असून त्याला कोर्टाने १४ वर्षाचा तुरुंगवास सुनावला.नवीन प्रोमोत दाखवण्यात आल्याप्रमाणे १४ वर्षानंतर कार्तिक तुरुंगातून बाहेर आला आहे. त्याला घेण्यासाठी दीपा आणि तिच्या मुलीही आल्या आहेत.पण या मुली आता मोठ्या झाल्यात.

या मालिकेतील मुली कधी मोठ्या होणार? या मालिकेच्या कार्तिकी, दीपिका या भूमिका कोणत्या अभिनेत्री साकारणार? अशी चर्चा नेहमी सोशल मीडियावर रंगली. तर आता कार्तिकी आणि दीपिका मोठ्या झाल्या असून यांची भूमिका अनुष्का पिंपुटकर आणि तनिष्का विषे या साकारणार आहेत. नुकतंच या मालिकेच्या प्रोमोत या अभिनेत्री कार्तिकी आणि दीपिकाच्या भूमिकेत दिसल्या. तर हा प्रोमो पाहून अनेक चाहते आनंदी झालेत तर काहींनी या प्रोमोवर नाराजी व्यक्त केली.(Rang Maza Vegla)
====
हे देखील नक्की वाचा-कोकणची लोकधारा जपत प्रभाकर मोरेंनी फॉरेनर्सला लावले थिरकायला
====
या मालिकेत अभिनेत्री अनुष्का पिंपुटकर ही कार्तिकीच्या भूमिकेत झळकणार आहे आधी ती कलर्स मराठीवरील आई मायेचं कवच या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस आली होती तर यातील तिची सुहानी भूमिका चाहत्यांच्या पसंतीस उतरली. यासोबतच तनिष्का विषे ही दीपिकाच्या भूमिकेत जाळणार असून तिने काही नाटक ,वेब सिरीज यांमध्ये काम केलं आहे. तर या मालिकेत आता सर्वच पात्रांचे लूक देखील वेगळे पाहायला मिळणार आहेत.