नाना पाटेकर यांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात छबिलदास प्रायोगिक रंगभूमीवरून सुरू केली. त्यानंतर अनेक नाटकं, चित्रपटात त्यांनी लक्षवेधी भूमिका साकारल्या. सिनेमाविश्वातील अभिनयाचे विद्यापीठ म्हणून नानांकडे पाहिले जाते. हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीसह इंग्लिश चित्रपटातही नानांनी आपला ठसा उमटविला. (nana patekar injured)
अभिनया व्यतिरिक्त ते समाजकार्यातही माहीर आहेत. आजवर नानांच्या नावावर बरेच अवार्ड आहेत. मात्र या सर्व अवार्डमधील लक्षवेधी अवार्ड म्हणजे नानांच पहिलं नॅशनल अवॉर्ड म्हणून ‘परिंदा’ चित्रपटातील भूमिकेसाठी मिळालेल ‘बेस्ट सपोर्टींग ऍक्टर’ आहे. अर्थात असे म्हणण्याचे कारणही तसेच आहे.

नानांना मिळालेलं हे पहिलं नॅशनल अवॉर्ड आहेच, मात्र कित्येक वर्षांनी एका मराठी अभिनेत्याला नॅशनल अवॉर्ड मिळालेला होता. ‘परिंदा’ मधील खलनायकाची नानांनी साकारलेली अण्णा ची भूमिका नाना अक्षरशः जळले होते. ‘परिंदा’च क्लायमॅक्सच शूटिंग करत असताना नानांचा अपघात झाला होता. डमी न घेता सीन शूट करणारे नाना उभे पेटले होते. त्या आगीत नानांचा कोळसाच झाला असता. मात्र त्या पेटलेल्या अवस्थेतही प्रसंगावधान राखून नानांनी आठ दहा फुटांवरून खाली उडी मारली, म्हणून ते थोडक्यात बचावले. पण ते जबरदस्त भाजले होते. हे सारं प्रकरण त्यांच्या जीवावर बेतलं असतं.
या कामगिरीसाठी अमिताभ बच्चनने केलं नानांचं कौतुक (nana patekar injured)
दरम्यान ते ‘नानावटी हॉस्पिटल’मध्ये ऍडमिट झाले होते. जळलेली कातडी तशीच राहिली तर ती विचित्र सुरकुतल्यासारखी दिसते. त्यामुळे ती कातडी खेचून वा सोलून काढली जायची. त्यावेळी नानांनी डॉक्टरांना सांगितलं होत की, ‘मी कितीही ओरडलो, चिडलो काहीही बोललो, तरी माझ्याकडे लक्ष देऊ नका. तुम्ही तुमचं काम करा.’ हे सारं नानांशिवाय आणखी कोणी सहन करू शकलं नसत.
त्या अपघातातून बरे झाल्यावर त्यांनी चित्रपटाचं उरलेलं शूटिंग आणि डबिंग पूर्ण केलं. तर त्या क्लायमॅक्सच ही त्यांनी पुन्हा शूटिंग केलं. या किस्स्यानंतर जेव्हा ‘परिंदा’ चित्रपट अमिताभ बच्चन सारख्या दिग्गज अभिनेत्याने पाहिला त्यावेळी न राहवून त्यांनी नानाला फोन केला आणि अभिनय आवडल्याचं आवर्जून सांगितलं.

नानांना ‘परिंदा’साठी मिळालेल्या अवार्डसाठी अमिताभ बच्चन, मिथुन चक्रवर्ती, सुनील गावस्कर यांनी फोन करून आणि पत्रं पाठवून तर काहींनी प्रत्यक्ष भेटून त्यांचं अभिनंदन केलं. या सर्वांपेक्षा बोलकी आणि महत्वाची प्रतिक्रिया आली ती नानांच्या आई कडून. ‘परिंदा’ पाहिल्यावर त्यांची आई त्यांना म्हणाली, ‘पुन्हा असली कामं करू नकोस रे बाबा!’ नानांच्या अभिनयाची ही खरी पोचपावती आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही.
====
हे देखील वाचा – ‘खूप उशिरा आलात हो या इंडस्ट्रीत’… ‘या’ दिग्गजांच्या कौतुकाने मामा झालेले भावुक
====
‘परिंदा’, ‘क्रांतिवीर’, ‘अपहरण’, ‘पक पक पकाक’, ‘देऊळ’, ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे’, ‘नटसम्राट’, ‘आपला माणूस’ या चित्रपटातून नानांनी विविधरंगी भूमिका केलेल्या आहेत. नानांच्या अभिनयाने साऱ्या रसिक प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतलाय.
