एखाद्या विशिष्ट कलाकृती मध्ये कलाकार जेव्हा प्रेक्षकांच्या भेटीला येतो तेव्हा प्रेक्षकांना हे कधी संपूच नये असं वाटत मग त्या कलाकृतीचे एकामागोमाग एक भाग येत जातात आणि प्रेक्षकांना निराश न करता मनोरंजनाची हा गाडी अशीच धावत राहते. प्रेक्षकांच्या मनाला भावलेली अशीच एक कथा जी या आधी २ भागांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आहे त्या कलाकृतीचा पुढचा भाग ही आता प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. मनोरंजनाच्या विश्वातील या गाजलेल्या शॉर्ट फिल्मचं नाव आहे ‘ ‘दोन कटींग’.(samruddhi kelkar)

अभिनेता आणि बिग बॉस सिझन ४ चा विजेता अक्षय केळकर आणि फुलाला सुगंध मातीचा या मालिकेतील कीर्ती म्हणजेच अभिनेत्री समृद्धी केळकर या शॉर्ट फिल्म मध्ये मुख्य भूमिकेत दिसले होते. लग्न या विषयावर आधारित ही कथा प्रेक्षकांच्या मनाला चांगलीच भावली होती. याच कथेचा तिसरा भाग लवकरच प्रदर्शित होणार असल्याची माहिती अभिनेत्री समृद्धी केळकर ने इंस्टाग्रामवर पोस्ट करत दिली आहे. इंस्टाग्राम स्टोरीत दोन चहाचे ग्लास आणि एक अक्षय सोबतचा फोटो शेअर करत comming soon अस लिहिलं आहे.(samruddhi kelkar)
====
हे देखील वाचा – अशक्य थापाडी आहेत ही न्यूज पोर्टल्स……….
====
फुलाला सुगंध मातीचा या लोकप्रिय मालिकेनंतर समृध्दी सध्या मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियरचा या शो मध्ये सूत्रसंचालन करताना दिसत आहे.