शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मालिकेच्या कलाकारांसोबतच प्राण्यांना सुद्धा आपुलकीने जपणारा निर्माता..

सौरभ जाधवby सौरभ जाधव
फेब्रुवारी 6, 2023 | 6:27 am
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
santosh ayachit

santosh ayachit

मराठी मालिका विश्वात सध्या कमालीची स्पर्धा पाहायला मिळते. प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी अनेक मालिका वाहिनीवर दिवसरात्र स्पर्धा करत असतात. या मालिकांच्या सिरीज मध्ये आध्यात्मिक मालिकांच्या यादीत गाथा नवनाथांची, बाळुमामाच्या नावानं चांगभलं यांसारख्या विषयांनी प्रेक्षकांना विशेष आकर्षित केलं आहे आणि या विषयांना लेखनबद्ध केलं आहे लेखक निर्माते संतोष आयाचित यांनी. लेखना व्यतिरिक्त संतोष यांची अजून एक खास शैली आहे ज्यामुळे त्यांची ही निराळी बाजू त्यांना इतरांपेक्षा वेगळं ठरवते.(santosh ayachit)

मालिकेच्या सेटवर अशी घेतली जाते प्राण्यांची काळजी..

संतोष आयाचित यांच्या सेट वर प्राण्यांची रेलचेल पाहायला मिळते. बाळुमामाच्या नावानं चांगभलं असो व गाथा नवनाथांची संतोष यांचं प्राणी प्रेम सर्वव्यापी आहे. गाथा नवनाथांची या मालिकेच्या सेट वर श्वानांची विशेष काळजी घेतली जाते. तिथे असणाऱ्या श्वानांसाठी संतोष यांनी खास सोय केली आहे त्यांना राहायला व्यवस्थित निवारा, खाण्यासाठी चांगलं अन्न, वैद्यकीय सुविधा या सर्वांची सोय सेट वर करण्यात आली आहे. (santosh ayachit)

बाबाळुमामाच्या सेट वर एकदा अचानक आलेल्या गायचा किस्सा त्यांनी सांगितला शूटिंगच्या मध्ये आलेली गाय खायला चारा देऊन, भीती दाखवून काही केल्या जागेवरून हालत न्हवती पण जेव्हा संतोष यांनी मायेने तिला कुरवाळलं तेव्हा काही क्षणातच गाय त्या जागेवरून बाजूला झाली. यातूनच संतोष यांची प्राण्यांना जीव लावण्याची कला दिसून येते.

जेव्हा सेट जवळून हरणांचा कळप गेला…

प्राण्यां बद्दल सांगताना संतोष यांनी हे सांगितलं काही दिवसांपूर्वी शूटिंगच्या ठिकाना वरून हरणांचा एक कळप गेला त्यातील एक हरणाचं पिल्लू तिथे त्यांना अडकलेलं सापडलं आणि जखमी अवस्थेत सापडलं त्यांनी त्या हरणाच्या पिल्लाला योग्य ते औषध उपचार करून त्याची काळजी घेतली आणि वनविभागाला त्या बद्दल माहिती दिली.गाथा नवथांच्या सेट वर संतोष यांनी तिथल्या स्थानिक श्वानांसाठी उत्तम सोय केली आहे अगदी सुरुवातीपासून त्यांनी त्या प्राण्यांची उत्तम निगा राखली आहे. त्या श्वानांबद्दल संतोष यांनी सांगितलं की प्राण्यांना जीव लावला कि ते सुद्धा त्यांचं काम प्रामाणिकपणे, अगदी चोख करतात. त्याचं उदाहरण देताना त्यांनी सांगितलं सेटच्या आसपास आलेल्या बिबट्याला या श्वानांनी एकदा पळवून लावलं. (santosh ayachit)

संतोष यांचं हे प्राणीप्रेम ते तंतोतंत जपतात सेट कोणताही असो कलाकारां एवढंच प्रेम ते प्राणिमात्रांवर सुद्धा करतात. अभिनेता, लेखक , दिगदर्शक, निर्माता हे त्यांच्या मेहनतीने प्रेक्षकांचं मनोरंजन करतच असतात पण त्यांची ही बाजू सुद्धा वाखन्याजोगी असते एवढं नक्की.

Tags: animal lovebalu mamachya navan changbhaldirectorgatha navnathanchiits majjaits majja exclusiveproducersantosh ayachitwriter
सौरभ जाधव

सौरभ जाधव

सौरभ जाधव, पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव. पत्रकारिकेचे शिक्षण गुरु नानक खालसा कॉलेज मधून पूर्ण केले असून पत्रकारिता क्षेत्रात पदव्युत्तर पदवी जोशी बेडेकर या कॉलेजमधून संपादन केली आहे. सुरुवातीला जनादेश वृत्तवाहिनी येथे काही काळ काम करून त्या नंतर कलाकृती मीडिया या डिजिटल पोर्टलला लेखक, सोशल मीडिया तसेच कॅमेरा विभागात देखील कामाचा अनुभव आहे. सध्या 'इट्स मज्जा' या पोर्टलमध्ये रिपोर्टर या पदावर कार्यरत आहे. कोणत्याही आवश्यक माहितीसाठी इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
shiv thakare

राजकारण क्षेत्रातून सुद्धा शिव ठाकरेला पाठिंबा

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.