अभिनेत्री कंगना रनौतच्या घरी यावेळी आनंदाच वातावरण आहे. नवरात्रीच्या शुभ दिवसांत कंगनाच्या घरी तान्ह्या बाळाचं आगमन झालं आहे. मावशी बनल्यानंतर आता कंगना आत्या बनली आहे. ही गोड बातमी तिने तान्ह्या बाळाबरोबरचे काही फोटो सोशल मीडियावरून पोस्ट करत दिली आहे. या फोटोंमध्ये कंगनाने बाळाला जवळ घेतलेलं पाहायला मिळतंय. आत्या झाल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहताना दिसतोय. फोटो शेअर करत तिने तिचा आनंद कॅप्शन देत शेअर केला आहे. (Kangana Ranaut Shared Goodnews)
अभिनेत्री कंगना रनौत आता आत्या बनली असून त्यांच्या घरी छोट्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. कंगनाने सोशल मीडियावर पोस्ट करून याबाबतची माहिती दिली आहे. सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये कंगना तिच्या भाच्याला घेऊन भावुक झाल्याचं ही पाहायला मिळालं. कंगनाची आई आशा रनौत, बहीण रंगोली आणि भाऊ अक्षत देखील खूप आनंदी असल्याचं दिसतंय.
आणखी वाचा – राष्ट्रीय पुरस्कार मिळताच आलिया भट्टने खरेदी केली अलिशान कार, कारची किंमत आहे तब्बल…
कंगनाने हा आनंद शेअर करत काही खास फोटो शेअर केले आहेत, या फोटोंखाली कॅप्शन देत तिने लिहिलं आहे की, “आज या शुभ दिवशी आमच्या कुटुंबाला पुत्ररत्नाचा आशीर्वाद मिळाला आहे, माझा भाऊ अक्षत रनौत आणि त्याची पत्नी रितू रनौत यांना मुलगा झाला आहे. आम्ही या तेजस्वी आणि मन मोहून टाकणाऱ्या मुलाचे नाव अश्वथामा रनौत ठेवले आहे. आमच्या कुटुंबातील नवीन सदस्याला तुम्ही सर्वांनी आशीर्वाद द्या. आम्ही तुम्हा सर्वांसोबत आमचा हा आनंद शेअर करत आहोत.”
कंगना रनौतचा भाऊ अक्षत याचे २०२० मध्ये लग्न झाले. कंगनाने आत्या झाल्याचा आनंद शेअर करत पोस्ट केलेल्या फोटोंवर तिच्या चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.