Sachin Pilgaonkar On Chandrayaan 3 अथक प्रयत्नानंतर ‘चांद्रयान-3’ मोहीम ही यशस्वीपणे पूर्ण झाली आहे. भारताच्या या कामगिरीसाठी इस्रोचे जगभारातून कौतुक होत आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणे हे खुप अवघड काम आहे. पण भारताने अशक्य असणारी ही गोष्ट शक्य करुन दाखवली आहे. भारताची चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणारा पहिला देश म्हणून ओळख निर्माण झाली आहे.’चांद्रयान 3’च चंद्रावर यशस्वी लँडिंग झाल्यामुळे संपूर्ण जगभरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे.(Sachin Pilgaonkar On Chandrayaan 3)
इस्रोच्या तसेच भारताच्या या अद्वितीय यशानंतर सर्व क्षेत्रातून या कामगिरीचं कौतुक होतं आहे.सिनेसृष्टीदेखील हे यश साजर करण्यात व इस्रोचं कौतुक करण्यात मागे राहिलेली नाही अनेक कलाकारांनी पोस्ट करत, व्हिडिओ शेअर करतं आपला आनंद व्यक्त केला आहे.या सर्व पोस्टमध्ये एका पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.एका वेगळ्या पद्धतीने तसेच आठवणींना उजाळा देतं अभिनेते सचिन पिळगांवकर यांनी या क्षणाचं कौतुक केलं आहे.
पाहा काय आहे सचिन पिळगांवकर यांची पोस्ट?(Sachin Pilgaonkar On Chandrayaan 3)
सचिन यांचा अजरामर चित्रपट ‘अशी ही बनवाबनवी’ मधील अजरामर अभिनेते ‘लक्ष्मीकांत बेर्डे’ यांचा फोटो शेअर केला आहे.’अशी ही बनवाबनवी’ हा चित्रपट कोणत्या ही काळातला प्रेक्षक तितक्याच उत्साहाने बघू शकतो.त्यातील लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पार्वती बाई या भूमिकेने प्रेक्षकांचं मन जिंकलं. चित्रपटातील लक्ष्मीकांत यांच्या डोहाळे जेवणाचा सीन प्रेक्षकांच्या डोळ्यसमोर जसाच्या तसा जिवंत आहे.त्याच डोहाळेजेवणतला लक्ष्मीकांत यांचा चंद्रावर बसलेला फोटो सचिन यांनी शेअर केला आहे.त्या फोटोच्या कॅप्शन मध्ये त्यांनी म्हंटल आहे,”चंद्रावर बसणार पहिला भारतीय” सचिन यांच्या या पोस्टने ‘चांद्रयान ३’च्या यशस्वी लँडिंगच कौतुक तर झालंच पंरतु ‘अशी ही बनवाबनवी’ चित्रपटाच्या तसेच लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या जुन्या आठवणींना देखील उजाळा दिला आहे.

सचिन यांच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.’अगदी चंद्रासारखेच होते लक्ष्मीकांत बेर्डे सर. कला व अभिनयाने नटलेला आमच्या लहानपणीचा नेहमी हसवणारा अभिनेता. जोडी शोभावी तर फक्त अशोक सराफ व लक्ष्मीकांत बेर्डे यांचीच आणि हे सर्व फक्त सचिन सर व कोठारे सर तुमच्यामुळे आम्हा प्रेक्षक वर्गाला पाहायला मिळाले. तुम्हला कोटी कोटी धन्यवाद.’, ‘पार्ट २ बनवा सुपरहिट होईल’ अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळाल्या.(ashi hi banwa banwi movie)