Sudesh Mhashilkar Message to Prachi Pisat : मराठी सिनेसृष्टीत सध्या अभिनेत्री प्राची पिसाटने केलेलं भाष्य चर्चेत आलं आहे. प्राचीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर दिग्गज अभिनेत्याने अश्लील मॅसेज केला असल्याचा स्क्रीनशॉट शेअर करत आरोप केले आहेत. मराठी अभिनेते सुशील म्हशीलकर यांनी प्राचीला अश्लील मॅसेज केला असल्याचं तिने पोस्ट केलेल्या स्क्रीनशॉटमधून समोर आलं आहे. प्राचीने शेअर केलेल्या या स्क्रीनशॉटमध्ये असं दिसून येतंय की, “तुझा नंबर पाठव ना… तुझ्याशी फ्लर्ट करायची इच्छा झालीये… कसली गोड दिसतेस” असा मॅसेज सुदेश यांनी प्राचीला केला आहे. या पोस्टवर प्राचीने खरमरीत कमेंट करत उत्तर दिलं आहे. सध्या प्राची पिसाट हे प्रकरण विशेष चर्चेत आलं आहे. काहींनी प्राचीच्या या करारीपणाचे कौतुक केले आहे तर काहींनी अभिनेत्याची बाजू घेत ते असं करणार नाहीत एकदा त्यांचं अकाउंट हॅक झालं आहे का ते तपासून पाहण्यास सांगितलं आहे.
दरम्यान, प्राचीला सिनेसृष्टीतून कलाकार मंडळींकडून भरभरुन पाठिंबा मिळाला आहे. अभिनेत्री, लेखिका शिल्पा नवलकर हिने प्राचीला मॅसेज करत पाठिंबा दर्शविला आहे. “तुझा मार्ग अगदी योग्य आहे प्राची. गप्प नाहीच बसायचं”, असं त्यांनी म्हटलं आहे. यावर उत्तर देत प्राचीने त्यांचे आभार मानले आहेत आणि असं म्हटलं आहे की, “खूप आभार ताई. या १२ तासात तुम्ही पहिल्या महिला आहात ज्यांनी गप्प बसायचं नाही असं ठणकावून सांगत पाठिंबा दर्शविला आहे. आभारी आहे”.

तर ‘ठरलं तर मग’ फेम प्राजक्ता कुलकर्णी यांनीदेखील प्राचीला संपोर्ट केला आहे. तिने पोस्ट शेअर करत असं म्हटलं आहे की, “ही पोस्ट शेअर करुन प्राची तू एकदम छान केलंस. कारण इंडस्ट्रीमधील काही लोकांना असं वाटतं की, सगळ्याच मुली अशा असतात आणि त्यांच्याकरिता सहज उपलब्ध असतात हा त्यांचा गैरसमज हा दूर व्हायलाच हवा. आणि काही लोकांमुळे आपली इंडस्ट्री बदनाम होत आहे ते तरी यामुळे होणार नाही. आम्ही इथे अगदी प्रामाणिकपणे काम करतो आणि आमच्या कुटुंबासहही प्रामाणिक राहतो”, अशी पोस्ट त्यांनी केली आहे. यावर प्राचीने त्यांना उत्तर देत, “ताई तुझे खूप आभार. मला तुझा अभिमान आहे. आई म्हणून तू आमच्या आजूबाजूच्या अनेक मुलींना धाडसी होण्यास प्रेरित केले आहेस”, असं म्हटलं आहे.
“तुझा नंबर पाठव ना… तुझ्याशी फ्लर्ट करायची इच्छा झालीये… कसली गोड दिसतेस”, “खूपच सेक्सी दिसायला लागलीयेस हल्ली…वाह”, असा मॅसेज सुदेश यांनी प्राचीला केला आहे. प्राचीने हे स्क्रीन शॉट शेअर करत, “आणि मला हा स्क्रीनशॉट पोस्ट करायची इच्छा झाली. बायकोचा नंबर असलेच. ती ही गोड आहे. बघ जरा तिच्याशी फ्लर्ट करायला जमतंय का?, ही पोस्ट डिलीट कर सांगायला कुठून तरी नंबर मिळवशील आणि कॉल करशीलच. जोवर तू फेसबुकवर जाहीर माफी मागत नाही तोवर ही पोस्ट अशीच राहील. आणि माफी मागायची इच्छा नसेल आणि तुम्हाला वेळ असेल तर इतर मुलींनी सांगितलेले किस्सेही सांगते”, असं लिहिलं आहे.