Martyr Surendra Moga Daughter : भारत-पाकिस्तानमधील युद्धजन्य परिस्थितीचा अनेकांना फटका बसला. पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर ही मोहीम आखत पाकिस्तानला चांगलीच अद्दल शिकवली. मात्र या लढाईत अनेक निष्पाप जीवांचा बळी गेला. तर रात्रंदिवस डोळ्यात तेल टाकून सीमेवर लढा देणाऱ्या अनेक सैनिकांनाही वीरमरण आले. देशासाठी बलिदान देणाऱ्या या वीर जवानांच्या कथा प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहेत. यापैकी एअर फोर्सचे सुरेंद्र मोगा झुंझुनु येथील मंदाव गावचे सुपूत्र हे एक अमर शहीदांपैकी एक नाव बनले आहे. जम्मू -काश्मीरच्या आरएस पुरा क्षेत्रात पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात शनिवारी (१० मे) रोजी त्यांना वीरता प्राप्त झाली. पण त्यांची ११ वर्षाची मुलगी वार्तिका हिने वडिलांच्या निधनानंतर जे काय म्हटलं ते ऐकून संपूर्ण देशाला तिचा अभिमान वाटला.
“मला माझ्या वडिलांचा अभिमान आहे, मी माझ्या वडिलांचा बदला घेईन”, हे शब्द जेव्हा या जवानाची लेक वार्तिकाच्या तोंडून निघाले तेव्हा तिच्या डोळ्यात अश्रू नव्हते, परंतु तिची बापासाठीची तळमळ तिच्या डोळ्यांत स्पष्ट दिसत होती. ही एक सामान्य मुलगी नाही, ती शहीदाची मुलगी आहे, ज्याने तिच्या वडिलांच्या शहिदतेला एक मिशन बनविले आहे. शनिवारी रात्री ९ च्या सुमारास सुरेंद्र मोगा यांनी आपली पत्नी सीमा आणि मुलीला अखेरचा फोन कॉल केला. त्यावेळी त्यांनी सांगितले की, पाकिस्तानी ड्रोन फिरत आहेत परंतु आतापर्यंत कोणताही हल्ला झाला नाही आणि ते सुरक्षित आहेत. पण हे त्यांचे शेवटचे संभाषण असेल हे कोणाला माहित नव्हते.
आणखी वाचा – बॉलिवूड कलाकार सरकारविरोधात का बोलत नाहीत?, जावेद अख्तर म्हणाले, “ईडी, सीबीआय पाठी लागली तर…”
#WATCH | Jhunjhunu, Rajasthan | Vartika, Daughter of Sergeant Surendra Moga, says, "I am feeling proud that my father got martyred while killing the enemies and protecting the nation… Last time, we talked to him at 9 PM last night and he said that drones are roaming but not… https://t.co/H0EI1xKw4e pic.twitter.com/0mIHuHT8iL
— ANI (@ANI) May 11, 2025
दुसर्या दिवशी सकाळी, जेव्हा सुरेंद्र मोगा आपल्यात नाहीत ही बातमी कानावर पडली तेव्हा कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन सरकली. पत्नीने तर अंगच टाकले. मात्र या सगळ्यात ११ वर्षाची चिमुरडी खंबीरपणे उभी होती. वडिलांनी देशसेवेसाठी प्राण गमावले ही बाब लक्षात घेता आता आपण कुठेच थांबून चालायचं नाही आपण वडिलांच्या मृत्यूचा बदला घ्यायचा आणि देशसेवा करायची हा विचार करत अश्रू रोखून धरले आणि म्हटलं, “पाकिस्तान संपला पाहिजे, पाकिस्तान हे नावही पुन्हा घेतले जाता कामा नये”.
“मला माझ्या वडिलांसारखे सैनिक व्हायचे आहे आणि मी माझ्या वडिलांचा बदला घेईन”, हे वाक्य केवळ ११ वर्षीय जवानाची लेक घेतेय ही कौतुकास्पद बाब म्हणावी. या जवानाच्या लेकीने घेतलेल्या या निर्णयाने अनेकांचे डोळे पाणावले. वार्तिकाच्या या निर्णयाचं केवळ झुंझुनूलाच नाही तर संपूर्ण देशाला अभिमान आहे. वडिलांचे अपूर्ण राहिलेलं मिशन पूर्ण करण्याचं एकमेव स्वप्न आता वार्तिका जगणार आहे. समस्त जनतेने वार्तिकाच्या या निर्णयाचं भरभरुन कौतुक केलं आहे.