Dattu More Baby Boy : मराठी कलाकार मंडळी एकामागोमाग एक चाहत्यांसह आनंदाची बातमी शेअर करताना दिसत आहेत. काहींनी लग्न बंधनात अडकल्याची, काहींनी घर घेतल्याची तर काहींनी आई-बाबा झाल्याची गुडन्यूज दिली. मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री अमृता पवार हिने नुकतीच आई झाल्याची आनंदाची बातमी शेअर केली आणि या पाठोपाठ आता आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्याने मुलगा झाल्याचा सुखद धक्का दिला आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला हा अभिनेता म्हणजे दत्तू मोरे. दत्तू मोरेने दोन वर्षांपूर्वी स्वाती घुनागेसह लग्नगाठ बांधली होती आणि आता दत्तू मोरे आणि स्वाती यांनी आई-बाबा झाल्याची गोड बातमी दिली.
दत्तू मोरेला मुलगा झाला असल्याच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सांगितलं. ही आनंदाची बातमी त्याने सोशल मीडिया पोस्टद्वारे चाहते मंडळींसाठी शेअर केली आहे. यावेळी त्याने त्याच्या चिमुकल्या बाळाची झलक ही दाखविली आहे. दत्तूच्या घरी चिमुकल्या सदस्याचं आगमन झालं असून दत्तूने बाळाची पहिली झलक या पोस्टद्वारे शेअर केली आहे. यातील एका फोटोमध्ये दत्तू आणि त्याच्या पत्नीने लेकाचा हात अलगद आपल्या हातांवर घेतला आहे तर, दुसऱ्या फोटोमध्ये दत्तूच्या लेकाने चिमुकल्या हातांनी बाबाचं बोट पकडल्याचं दिसतंय.
आणखी वाचा – दोन लेकींनंतर पुन्हा मुलीलाच दिला जन्म, आई-वडील रुग्णालयातच सोडून गेले अन्…; डॉक्टरांनी असं काही केलं की…
दत्तूने हे गोड फोटो शेअर करत त्यावर “फायनली… तो आला! We now officially have a tiny human to blame. माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा क्षण… मी सदैव कृतज्ञ आहे.” असं कॅप्शन दिलं आहे. दत्तूने दिलेल्या या आनंदाच्या बातमीनंतर अनेकांनी त्याच्या या पोस्टवर कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत. अनेक कलाकार मंडळींनीही त्याच्या या पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. सध्या त्याची ही पोस्ट अनेकांच्या पसंतीस पडली आहे.
आणखी वाचा – “नऊवारी साडीवर केस मोकळे सोडून नाचणं ही कुठली लावणी?”, हिंदवी पाटीलचा इशारा नक्की कोणाकडे?, थेट म्हणाली…
याप्रमाणेच दत्तूने त्याच्या लग्नाची बातमी सोशल मीडियावरुन शेअर केल्यानं सर्वानाच आश्चर्याचा धक्का बसला. दत्तूच्या लग्नाच्या बातमीने सर्वांच धक्का बसला होता. सुरुवातीला दत्तूच्या आणि स्वातीच्या प्री वेडिंग फोटोशूटचे फोटोंनी सोशल मीडियावर हवा केली. त्यांनतर दत्तूने २३ मे २०२३ रोजी स्वातीसह लग्नगाठ बांधली.