Amruta Pawar Baby Boy : मराठी अभिनेत्री अमृता पवार हिने चाहत्यांसह आनंदाची बातमी शेअर केली आहे. अभिनेत्रीने आई झाल्याची गुडन्यूज चाहत्यांसह दिली आहे. मालिकांमधून घराघरांत पोहोचलेली ही लोकप्रिय अभिनेत्रीने मुलाला जन्म दिला आहे. २६ एप्रिल रोजी तिने गोंडस अशा बाळाला जन्म दिला आणि आज तिने ही आनंदाची गोष्ट चाहत्यांसह शेअर केली. काही महिन्यांपूर्वीच अभिनेत्रीने आई होणार असल्याची बातमी चाहत्यांना दिली होती. आता अखेर ही मराठमोळी अभिनेत्री लग्नाच्या अडीच वर्षानंतर आई झाली आहे. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्रीच्या डोहाळ जेवणाचा कार्यक्रम अगदी थाटामाटात पार पडला होता. अखेर अमृता आणि तिचा पती नील यांनी आई-बाबा झाल्याची आनंदाची बातमी चाहत्यांसह शेअर केली आहे.
‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ या मालिकेतून अमृता पवार घराघरांत पोहोचली. अमृताने या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारत रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. आता अमृताने चाहत्यांना सुखद धक्का दिलेला पाहायला मिळत आहे. अमृताचा पती नील याने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर मुलगा झाल्याची बातमी शेअर केली. “कुटुंब! जिथे जीवन सुरु होते आणि प्रेमही संपत नाही”, असं कॅप्शन देत त्याने चिमुकल्याच्या आगमनाची आनंदाची खुशखबर दिली.
आणखी वाचा – टायगर भाईच्या भूमिकेत विजय निकम गाजवणार मोठा पडदा, ‘आतली बातमी फुटली’ चित्रपटात असणार मोठं सरप्राइज

अमृताने नीलची ही स्टोरी रिपोस्ट करत आई होण्याची भावना ही जगातील सर्वात सुंदर भावना असल्याचं म्हटलं. गेल्या महिन्यात २६ एप्रिलला अमृताने लेकाला जन्म दिला. लेक झाल्याच्या आनंद अमृताच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहताना पाहायला मिळत आहे. अमृताने नील पाटीलबरोबर २०२२ मध्ये लग्नगाठ बांधली. अगदी शाही थाटामाटात अमृता व नील यांचा विवाहसमारंभ पार पडला. आता दोघांच्या लग्नाला जवळपास तीन वर्ष पूर्ण होणार आहेत. त्यात त्यांनी मुलगा झाल्याची आनंदाची बातमी चाहत्यांसह शेअर केली.
आणखी वाचा – Video : लांबसडक केसांसाठी माधुरी दीक्षित करते घरगुती उपाय, घरीच बनवते तेल, व्हिडीओद्वारे दाखवली संपूर्ण झलक
मालिकाविश्व आणि चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारणारी अमृता सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. गरोदरपणामुळे तिने काही काळ सिनेविश्वातून ब्रेक घेतलेला पाहायला मिळाला. मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. बरेचदा ती पती नीलबरोबर फिरतानाचे अनेक फोटो, व्हिडीओही सोशल मीडियावर शेअर करते.