Housefull 5 Teaser : बॉलीवूडचा सर्वात लोकप्रिय फ्रेंचायझी ‘हाऊसफुल’ चित्रपटाचा पाचवा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘हाऊसफुल ५’ पाहण्यासाठी चाहते उत्सुकतेने वाट पाहत होते. आता हा मल्टीस्टारर चित्रपट पाहण्याची प्रतीक्षा संपणार आहे. ‘हाऊसफुल ५’चा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या टीझरमध्ये, निर्मात्यांनी संपूर्ण स्टारकास्ट सादर केली आहे. चित्रपटात एकूण १८ कलाकार दिसणार असल्याचं यादरम्यान समोर आलं आहे. निर्मात्यांनी संपूर्ण स्टारकास्ट ‘हाऊसफुल ५च्या टीझरसह सादर केली आहे. ज्यामध्ये प्रत्येकजण वेगवेगळ्या शैलीत दिसत आहे. हा टीझर विशेषतः चाहते मंडळींना खूप आवडला आहे.
१५ वर्षांपूर्वी या चित्रपटाचा पहिला भाग आला होता. ‘हाऊसफुल ५’चा टीझर अक्षयने सोशल मीडियावर शेअर केला आहे आणि लिहिले आहे की, “15 वर्षांपूर्वी … मॅडनेस सुरु झाला. भारताची सर्वात मोठी फ्रँचायझी ५ व्या हप्त्यासह परत आली आहे आणि यावेळी ती केवळ अराजक आणि विनोदी नाही …. परंतु एक किलर एक विनोद आहे. येथे हाऊसफुल ५ चा टीझर आहे. हा चित्रपट जून महिन्यात थिएटरमध्ये प्रदर्शित होईल”.
आणखी वाचा – IPL मध्ये १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचीच हवा, बॉलिवूड कलाकारांनाही भुरळ, कौतुक करत म्हणाले…
टीझरमध्ये, सर्व कलाकार प्रथम क्रूझवर दर्शविले गेले आहेत. हे पाहताना असे दिसते की प्रत्येकजण क्रूझवर पार्टीसाठी गेलेले दिसत आहेत. जिथे आधीच एक खून झालेला आहे. खून करणाऱ्या व्यक्तीच्या मुखवट्याची यावेळी झलक दिसली. आता हा किलर कोण आहे हे पाहण्यासाठी, आपल्याला चित्रपटाच्या प्रदर्शित होण्याची प्रतीक्षा करावी लागेल. ‘हाऊसफुल ५’ हा एक मोठी स्टारकास्ट असलेला चित्रपट असणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, अभिषेक बच्चन, रितेश देशमुख, संजय दत्त, फरदीन खान, नाना पाटेकर, जैकी श्रॉफ, डिनो मोरिया, चंकी पांडे, जॉनी लीवर, श्रेयस तलपड़े, निकितिन धीर, रंजीत, आकाशदीप साबिर, जैकलीन फर्नांडिज, नर्गिस फाखरी, चित्रांगदा सिंह आणि सौंदर्या शर्मा ही कलाकार मंडळी धुमाकूळ घालणार आहेत.
या व्यतिरिक्त, चित्रपटात आणखी किती अभिनेते आहेत हे देखील लवकरच कळेल. चित्रपटात इतकी मोठी स्टारकास्ट पाहून प्रत्येकाला धक्का बसला. टीझरमध्ये, एकमेव लाल परी गाणे पार्श्वभूमीत वाजत आहे.