नृत्यांगना गौतमी पाटील कायमच चर्चेत असते. तिच्या नृत्याचे लाखो दिवाने चाहते आहेत. सबसे कातिल गौतमी पाटील या तिच्या वाक्याने कित्येकांना घायाळ केलं आहे. गौतमी विशेषतः कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. मात्र बऱ्याच कालावधीपासून गौतमी शांत होती. दरम्यान गौतमीचे कोणतेच कार्यक्रमही होतं नव्हते. (Gautami patil statement)
अशातच बऱ्याच दिवसांनी गौतमीचा अहमदनगर येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या शोला लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत तसेच महिलाही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या कार्यक्रमावेळी गौतमीचा डान्स सुरु असताना काही तरुण मंडळींनी दंगा सुरु केला. दरम्यान कार्यक्रमावेळी दगडफेकही करण्यात आली. एका महिलेला दगडही लागला आणि ती महिला जखमी झाली. त्याक्षणी कार्यक्रम थांबवण्यात आला आणि पोलिंसाच्या देखरेखीखाली वातारवर्ण शांत करण्यात आलं.
पाहा काय म्हणाली गौतमी पाटील (Gautami patil statement)

हा सगळा गोंधळ पाहता यावर गौतमी पाटीलने भाष्य केलं आहे, गौतमी म्हणाली की, “आज खुप दिवसांनी माझा कार्यक्रम झाला. कार्यक्रमादरम्यान प्रेक्षकांची खुप गर्दी असते. त्यामुळे मागच्या प्रेक्षकांना डान्स दिसत नाही. त्यामुळे थोडा गोंधळ झाला. कार्यक्रम छान झाला मात्र गोंधळामुळे मी कार्यक्रम लगेच बंद केला. कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी मी प्रत्येक आयोजकाला चांगल्याप्रकारे आयोजन करा.”
“कार्यक्रमात बंदोबस्त व्यवस्थित प्रकारे करा असं सांगत असते. ज्यामुळे असा गोंधळ मारफेक होणार नाही. जर कार्यक्रमात असाच गोंधळ होत असेल तर मी यापुढे कार्यक्रम करणार नाही. कार्यक्रम करणं बंद करेल.’ असं म्हणत तिने कार्यक्रमात झालेल्या गोंधळाप्रकरणी भाष्य केलं आहे.”
“