Buldhana News : ऐकावं तितकं नवलंच! आजकाल माध्यमांद्वारे वा सोशल मीडियाद्वारे नेहमीच नवनवीन विषय कानावर येत असतात. रेप केस, बलात्कार, फसवणूक, आजारपण, हत्या, मारामारी यांच्या अनेक बातम्या नेहमीच आपण पाहतो. पण काही दिवसांपासून बुलढाणा जिल्ह्यात सुरु असलेल्या प्रकाराची बातमी समोर आली आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या. गेल्या डिसेंबर पासून बुलढाणा जिल्ह्यावरखूप मोठं संकट ओढवलं. डिसेंबर महिन्यापासून बुलढाणा येथील काही गावांत केसगळतीला सामोरे जावे लागले आणि हा विषय गंभीर होत गेला. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव, नांदुरा, खामगाव तालुक्यातील अनेक गावात अचानक केस गळतीने नागरिक हैराण झाले.
केस गळतीचा विषयाला गंभीर वळण लागणार इतक्यात आणखी एका विषयाने यांत डोकावले आणि नागरिकांना पळता भुई करुन सोडले. केस गळती झालेल्या रुग्णांची आता नखं गळती सुरु झाल्याची माहिती समोर आली आहे. केस गळती झालेल्या रुग्णांची नखं कमजोर होऊन विद्रूप झालेली नखं गळून पडत आहे. या गळती प्रकरणाने बुलढाणामध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं दिसत आहे. अनेक नागरिक या आजाराने ग्रासले असून शासनाचं याकडे लक्ष नाही असं स्पष्टपणे बोलताना दिसत आहेत.
आणखी वाचा – मच्छरांच्या मृत्यूची नोंद ठेवणारी मुलगी, मेल्यावर पेपरवर चिटकवूनही ठेवते, नाव, ठिकाण, वेळ लिहिते अन्…
नेमका आजार आहे तरी काय?
या परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये भीतीच वातावरण पसरलं आहे. गेल्या डिसेंबर महिन्यापासून नागरिकांची फक्त तपासणी झाली. ICMR चे पथक येऊन अनेकदा रक्ताचे नमुने घेऊन गेले. मात्र, औषध उपचाराच्या नावावर रुग्णांना काहीच दिले नसल्याचा आरोप करत आरोग्य व जिल्हा प्रशासनाने रुग्णांना वाऱ्यावर सोडल्याचा आरोप नागरिक करत आहेत. अद्यापही ICMR चा अहवाल जाहीर करण्यात आलेला नसल्याने सरकार नेमकं काय लपवू पाहत आहे? यावर नागरिकांनी शंका उपस्थित केली आहे. हा आजार नक्की कोणता आहे हा प्रश्न काही केल्या सुटत नाही आहे.
आणखी वाचा – लग्न न करताच ४९व्या वर्षी अमीषा पटेल गरोदर?, फोटोंमध्ये पोट दिसताच चर्चा, नक्की प्रकार काय?
आजाराबाबत अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण
‘एबीपी माझा’च्या वृत्तानुसार बुलढाणा आरोग्य अधिकारी (वर्ग एक) डॉ. अनिल बनकर यांनी म्हटलं की, “एकूण चार गावांमध्ये नखांची समस्या असलेले रुग्ण आढळून आले आहेत. काही रुग्णांमध्ये नखांची गळती होत आहे. चार गावांमध्ये सध्या एकूण २९ रुग्ण आढळून आले आहेत. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले आहे. पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय शेगाव येथे सांगण्यात आले आहे. सेलेनियमचे वाढत्या प्रमाणामुळे ही समस्या होत असल्याचा अंदाज आहे. जे केस गळतीचे रुग्ण आहेत, त्यांच्यामध्ये सध्या नखं गळतीची समस्या जाणवत आहे”, असे त्यांनी यावेळी सांगितले.